Dhule Constituency 2024: 'सुभाष भामरेंचा पराभव फक्त मीच करू शकतो' तुषार शेवाळेंना भलताच कॉन्फिडन्स

Loksabha Election 2024 : भाजपने धुळे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर फारशा हालचाली नाहीत. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार कोण याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.
Tushar Shewale
Tushar ShewaleSarkarnama
Published on
Updated on

Tushar Shewale News: धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवार कोण? याची उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर रोज नव्या इच्छुकांची नावे पुढे येत आहेत.

धुळे लोकसभा मतदारसंघासाठी Dhule loksabha constitunecy काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांच्याकडून इच्छुकांची चर्चा आणि चाचपणी सुरू आहे. मतदारसंघातील राजकीय वातावरणाचा पक्षाकडून नियमित आढावा घेतला जात आहे. भाजपने येथून विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे Subhash Bhamre यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर फारशा हालचाली नाहीत. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार कोण, याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Tushar Shewale
Vikhe Vs Lanke : सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी; नगरमध्ये नेमकं काय सुरू?

काँग्रेसचे नाशिक जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे Tushar Shewale यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. यासंदर्भात बोलताना वरिष्ठांशी यासंदर्भात नियमित संपर्कात आहे. मी उमेदवारी करावी अशी मालेगाव, सटाणा, धुळे या सर्व भागात कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे काँग्रेसने Congress देखील उमेदवार देताना स्थानिक उमेदवाराला प्राधान्य दिले पाहिजे. त्याचा निवडणुकीत मोठा लाभ होईल.

या मतदारसंघात काँग्रेसकडे धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांचे नाव चर्चेत होते. आता ते मागे पडले आहे. नाशिकच्या महापौर डॉ. शोभा बच्छाव Shobha bacchav , नंदूरबारचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी Chandrakant Raghuvanshi आणि डॉ. शेवाळे यांची नावे सध्या चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. शेवाळे यांनी गेल्या तीन निवडणुकांपासून मी धुळे मतदारसंघात काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे, असे सांगितले. यानिमित्ताने माझा नियमित संपर्क आहे. मालेगाव अर्थात स्थानिक उमेदवार म्हणून प्राधान्य दिल्यास सध्याच्या निवडणुकीत पक्षाला लाभ होईल. ही जागा सहज जिंकता येईल. भारतीय जनता पक्षाचे उमेदवाराबाबत मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अँटी इन्कमबन्सी आहे. भाजपचे कार्यकर्तेदेखील नाराज आहेत. त्याचा लाभ काँग्रेस पक्षाला घेता येईल, असा दावा डॉ. शेवाळे यांनी केला.

Edited By : Rashmi Mane

R

Tushar Shewale
Raver Lok Sabha 2024: रावेर लोकसभेसाठी शरद पवारांचा उमेदवार ठरला; श्रीराम पाटील यांचे नाव निश्चित

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com