NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला 1 वर्ष कारवास! काय आहे प्रकरण

NCP corporator Chandrashekhar Dusane sentenced to one year in jail : देवपूर भागातील नरडाणा चौफुली येथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पोलिस उपनिरीक्षक पुनम अशोक श्रीवास्तव आणि त्यांचे सहकारी वाहनांची तपासणी करीत होते.
Dhule city News
Dhule city NewsSarkarnama
Published on
Updated on

Dhule city News: पोलिसांनी शहरात नाकाबंदी करून वाहन तपासणी मोहीम राबविली होती. यावेळी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे नगरसेवकाने पोलिसांची धक्काबुक्की करीत उज्जत घातली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक चंद्रशेखर दुसाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांशी हुज्जत घालणे चांगलेच महागात पडले आहे. या संदर्भात पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणणे आणि पोलिसांची वाद केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

या संदर्भात धुळे कनिष्ठ स्तर न्यायालयाच्या न्यायाधीश जयश्री आर. पुलाटे यांनी या खटल्याची सुनावणी केली. यावेळी विविध साक्षीदार आणि पोलिसांचे जबाब नोंदविण्यात आले. माजी नगरसेवक दुसाने यांसह त्यांच्या पाच सहकाऱ्यांना एक वर्ष शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.

धुळे शहरात देवपूर भागातील नरडाणा चौफुली येथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पोलिस उपनिरीक्षक पुनम अशोक श्रीवास्तव आणि त्यांचे सहकारी वाहनांची तपासणी करीत होते. यादरम्यान या चौकात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे नागरिकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली होती.

माजी नगरसेवक दुसाने आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाविस्कर, रमण हरी सोनवणे, केशव उत्तम देवरे उर्फ राजू पाटील यांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांची हुज्जत घालत वाहन तपासणी बंद करण्यास भाग पाडले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक जमले होते. माजी नगरसेवकाने 40 ते 50 नागरिकांसह या चौकात गोंधळ घातल्याने पोलिसांच्या कामकाजात अडथळा आला.

Dhule city News
Sofia Qureshi: सोफिया कुरेशींवर वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्याचा पाय खोलात! नवे सरन्यायाधीश करणार सुनावणी; देशद्रोहाचा खटला...

यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक पुनम श्रीवास्तव, पोलीस हवालदार रवींद्र नारायण पाटील, बाळू ओमकार सोनवणे आणि तपास अधिकारी योगेश खटकळ यांच्या साक्षीवरून ही शिक्षा सुनावण्यात आली. माजी नगरसेवक चंद्रशेखर दुसाने हे शिवसेना पक्षाचे नगरसेवक होते. तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक केली होती. माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांना शिक्षा झाल्याने धुळे शहरात तो चर्चेचा विषय ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com