धुळे बँक निवडणूक; `शेतकरी` व `किसान`ने प्रत्येकी २ जागा जिंकल्याने चुरस वाढली

धुळे बँक; बिनविरोधचे स्वप्न भंग करणारे पोपटराव सोनवणेंच्या मुलाचा धक्कादायक पराभव
Dhule Dcc Bank
Dhule Dcc BankSarkarnama
Published on
Updated on

धुळे : धुळे- नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली. यामध्ये सर्वपक्षीय शेतकरी विकास व चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) यांच्या नेतृत्वाखालील किसान विकासने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या. त्यामुळे आमदार अमरीशभाई पटेल (DCC Bank) यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलचा गवगवा असली तरीही किसान संघर्ष पॅनेलने देखील आव्हान दिल्याचे चित्र आहे.

Dhule Dcc Bank
देवेंद्र फडणवीस यांचे संकेत, एस. टी. कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण अशक्य

आज सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. बँकेच्या सतरा जागांपैकी सात जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. दहा जागांसाठी वीस उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे शेतकरी विकास आणि किसान संघर्ष या पॅनेलमध्ये सरळ लढत आहे. त्यात सुरवातीला दहा पैकी चार जागांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये दोन जागा महाविकास आघाडीच्या किसान संघर्ष पॅनलला तर दोन जागांवर भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले.

Dhule Dcc Bank
...तर एसटीला खासगीकरणाशिवाय पर्याय नाही

भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनल तर्फे हर्षवर्धन दहिते व राजेंद्र देसले यांचा विजय तर महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनल मधून चंद्रकांत रघुवंशी व संदीप वळवी यांचा विजय झाला. या निवडणुकीदरम्यान सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलतर्फे ही निवडणूक बिनविरोध करण्याचं स्वप्न भंग करणार्‍या साक्री येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पोपटराव सोनवणे यांच्या मुलाचा अक्षय पोपटराव सोनवणे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे.

या बँकेत १७ जागांपैकी सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यापैकी सहा जागांवर भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय आणि शेतकरी विकास पॅनल तर एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार विजयी विजयी झाला आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com