Congress
Congress Sarakarnama

Congress Lok Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का; दोन जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

Dhule constituency 2024: धुळे लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाने माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. त्याचे तीव्र नकारात्मक पडसाद पक्षात उमटले आहेत. त्यामुळे आज काँग्रेसला मोठा धक्का बसला.
Published on

धुळे मतदार संघात (Dhule Lok Sabha Constituency 2024) भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamre) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता. या संदर्भात काल सायंकाळी पक्षाने माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. डॉ. शोभा बच्छाव या मतदार संघाबाहेरच्या आहेत, अशी नाराजी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केल्याचे तीव्र पडसाद काँग्रेस पक्षात उमटले आहे. धुळे काँग्रेसचे अध्यक्ष आणि इच्छुक शाम सनेर यांनी आज सकाळी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. काँग्रेस पक्षाने मतदार संघातील व प्रबळ उमेदवार देण्याची संधी घालविली आहे. याबाबत नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आपण पक्षाचा राजीनामा देत आहोत. लवकरच पुढील भूमिका जाहीर करू, असेही त्यांनी जाहीर केले. यावेळी धुळे शहरातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील सनेर यांच्यासोबत होते.

सनेर यांनी राजीनामा दिल्याच्या पाठोपाठ नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी आज मालेगाव येथे पत्रकार परिषद घेतली. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. यावेळी विविध पदाधिकारी उपस्थित होते. धुळे मतदारसंघात काँग्रेस पक्षाला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत ही जागा पक्षाला जिंकता आली असती. मात्र मतदारसंघाबाहेरचा उमेदवार देण्यात आला आहे. याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्यात आलेले नाही. त्यामुळे कार्यकर्ते अतिशय व्यथीत आहेत. त्यामुळेच दबावामुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

Congress
Pooja Tadas News: मोदीजी, मला न्याय द्या; भाजप खासदाराच्या सुनेची विनंती; पूजा तडस यांचे कुटुंबियांवर गंभीर आरोप

डॉ. बच्छाव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज सकाळी पक्षात अतिशय वेगाने हालचाली घडल्या. अनेक कार्यकर्त्यांनी याबाबत नेत्यांची संपर्क साधून नाराजी व्यक्त केली. उमेदवार बदलण्याबाबत अनेकांनी आग्रह धरला. दोन्ही जिल्ह्यांच्या अध्यक्षांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. धुळे मतदार संघात गेले दोन महिने पक्षाला उमेदवार मिळत नव्हता. येथील प्रमुख नेते आमदार कुणाल पाटील निष्क्रिय राहिले, असा ठपका कार्यकर्त्यांनी ठेवला आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com