Dhule Lok Sabha 2024 voting News : भाजपमध्ये आता राम आहे की नाही? धुळ्यात मतदानासाठी गर्दी; मतदार म्हणाले...

BJP Vs Congress : धुळे मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे आणि महाविकास आघाडीच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यात सरळ लढत होती. दोन्हीही बाजूंनी प्रचारात पूर्ण ताकत झोकून देण्यात आली होती.
Subhash Bhamre, Shobha Bachhav
Subhash Bhamre, Shobha BachhavSarkarnama
Published on
Updated on

Dhule Political News : धुळे लोकसभा मतदारसंघात गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा प्रचंड उत्साह दिसून आला. असे असले तरी धुळ्यातील मतदानाचा टक्का घसरण्याचीच शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीत पक्षीय यंत्रणा हतबल झाल्या, तरीही मतदारांनी ही निवडणूक ताब्यात घेतल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे मतदारांनी नेमका कुणाला कौल दिला याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

धुळे मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे आणि महाविकास आघाडीच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यात सरळ लढत होती. दोन्हीही बाजूंनी प्रचारात पूर्ण ताकत झोकून देण्यात आली होती. राष्ट्रीय नेत्यांनी या प्रचारात रंगत आणली. मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी यातील कोणता मुद्दा मतदारांवर प्रभावी ठरला, याचे उत्तर देणे सगळ्यांनाच कठीण बनले.

धुळे लोकसभेतील सर्व विधानसभा मतदारसंघात सोमवारी (ता. २०) मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. दुपारी उन्हाच्या तडाख्याने नागरिकांनी मतदानाला बाहेर पडणे टाळले. सायंकाळी चारनंतर पुन्हा तो उत्साह दिसून आला. विशेषतः मालेगाव शहर आणि धुळे शहरात मतदानाची वेळ संपल्यानंतरही शेकडो नागरिक मतदान केंद्रात होते. त्यामुळे साडेसातपर्यंत मतदान सुरू असल्याचे दिसले.

या निवडणुकीत शेतकरी आणि शेती यांचा प्रश्न अतिशय प्रभावीपणे चर्चा होती. या मुद्द्यांपुढे भाजपचे अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि आपकी बार मोदी सरकार हे दोन्हीही प्रचाराचे मुद्दे त्यापुढे झाकले गेले. त्याचाच परिणाम म्हणून अनेक ठिकाणी उमेदवार तसेच पक्षाचे कार्यकर्ते लोकांपर्यंत जाऊ शकले नाही. मात्र ते सगळे लोक मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांना हवे असलेले मतदान त्यांनी केले. अशी निवडणूक यापूर्वी पहायला मिळाली नव्हती. त्यातील वेगळेपणा म्हणजे, भाजपने प्रयत्न करूनही धुळ्यासारख्या संवेदनशील मतदारसंघात धार्मिक धृवीकरण होऊ शकले नाही. यातच या मतदारसंघाचा निकाल दडलेला आहे मतमोजणीतून तो स्पष्ट होईल, असे शरद पवार गोटात चर्चा आहे.

धुळे मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत ६१ टक्के मतदान झाले होते. यंदा सर्व सहा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ५ पर्यंत सरासरी ४९ टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी आठ ते नऊ टक्के वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाचे प्रमाण गत निवडणुकीपेक्षा कमी राहण्याची दाट शक्यता आहे.

पाचपर्यंत झालेले मतदान

धुळे शहर ५०.३१ टक्के, धुळे ग्रामीण ४५.१६ टक्के, शिंदखेडा ४५.८४ टक्के, मालेगाव शहर ५७.०२ टक्के, मालेगाव बाह्य ४७ टक्के आणि बागलाण ४७.०१ टक्के, अशी होती. यामध्ये सतत काँग्रेसला आघाडी देणाऱ्या मालेगाव शहरात लक्षणीय मतदान झाले आहे. त्यामुळे हे मतदान भाजपची चिंता वाढवू शकते.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com