Dhule Lok Sabha News : धुळ्यातील ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढला, शहरी भागात घट; भामरेंसाठी धोक्याची घंटा की प्लस पॉंईंट ?

Political News : धुळे मतदारसंघात सर्वाधिक मतदान हे मध्य मालेगावचे नोंदवले आहे. ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे हे मतदान भाजप (Bjp) खासदार सुभाष भामरेंसाठी (Subhash Bhamre) धोक्याची घंटा ठरणार की प्लस पॉंईंट, याची चर्चा जोरात रंगली आहे.
Dr. Subhash Bhamre, Dr. Shobha Bachhav
Dr. Subhash Bhamre, Dr. Shobha BachhavSarkarnama

Dhule News : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान केले जात आहे. राज्यातील 13 मतदारसंघासह मुंबईतील ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरु आहे. सर्वत्र चुरशीने मतदान होत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धुळ्यात सकाळच्या सुमारास मोठ्या उत्साहात मतदानाला हजेरी लावली. मात्र दुपारच्या सुमारास धुळे शहरात मतदान काहीसे थंडावल्याचे चित्र बघायला मिळाले. आतापर्यंत धुळे मतदारसंघात सर्वाधिक मतदान हे मध्य मालेगावचे नोंदवले आहे. धुळ्यातील ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे हे मतदान भाजप (Bjp) खासदार सुभाष भामरेंसाठी (Subhash Bhamre) धोक्याची घंटा ठरणार की प्लस पॉंईंट, याची चर्चा जोरात रंगली आहे. काँग्रेसच्या (Congress) उमेदवार शोभा बच्छाव (Shobha Bachav) त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत. (Dhule Lok Sabha News)

Dr. Subhash Bhamre, Dr. Shobha Bachhav
Uddhav Thackeray News: मतदान संपण्याच्या काही तास आधी ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; म्हणाले, 'आमचं मतदान जास्त तिथेच...'

राज्यभरातील अनेक मतदान केद्रांवर सोमवारी सकाळपासूनच मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, अनेक ठिकाणी मतदार यादीमधील घोळ, ऐनवेळी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने नागरिकांमध्ये रोष उमटतांनाचे चित्र आहे. राज्यात सर्वाधिक मतदान हे दिंडोरी येथे झाले असून त्या खालोखाल पालघर मतदारसंघात मतदानाची आघाडी बघायला मिळत आहे. तर धुळे लोकसभेत दुपारी 3 वाजेपर्यंत 39.97 टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे.

धुळे लोकसभेसाठी 39.97 टक्के मतदान

धुळ्यात सकाळच्या सुमारास मोठ्या उत्साहात मतदानाला हजेरी लावली. मात्र दुपारच्या सुमारास धुळ्यात मतदान काहीसे थंडावल्याचे चित्र बघायला मिळाले. आतापर्यंत धुळे मतदारसंघात सर्वाधिक मतदान हे मध्य मालेगावचे नोंदवले आहे. तर सर्वात कमी मतदानाची नोंद ही बागलाण येथे झाली आहे.

बागलाण येथे 37.69 टक्के, धुळे शहर येथे 38.41 टक्के मतदान झाले आहे. तर धुळ्याच्या ग्रामीण भागातही 42.34 टक्के मतदान झाले आहे. मालेगाव मध्य 43.68 टक्के, मालेगाव आऊटर येथे अवघे 38 टक्के मतदान झाले, तर सिंधखेड येथे 39.55 टक्के असे एकूण धुळे लोकसभेत दुपारी 3 पर्यंत 39.97 टक्के मतदान झाले आहे.

धुळ्यातील ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे हे मतदान भाजप खासदार सुभाष भामरेंसाठी धोक्याची घंटा ठरणार की प्लस पॉंईंट, याची चर्चा जोरात रंगली आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dr. Subhash Bhamre, Dr. Shobha Bachhav
Lok Sabha Election 2024 : काय सांगता! पठ्ठ्यानं भाजपला आठ वेळा केलं मतदान

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com