Dhule NCP News: शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा!

Dhule NCP Demands Sharad Pawar should withdraw his Resignation: धुळ्यात संघटित होत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी
NCP workers at Dhule
NCP workers at DhuleSarkarnama

Dhule Ncp : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत निवृत्तीची घोषणा केली. त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी संघटित होत येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली. (NCP workers appeal Sharad pawar should keep on as president)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी कायम रहावे. राष्ट्रवादी काँग्रेसचा देशाच्या राजकारणातील दबदबा कायम ठेवण्यासाठी त्याची गरज आहे, असा ठराव धुळे (Dhule) शाखेने केला आहे.

NCP workers at Dhule
Sakri APMC news : साक्री बाजार समितीत भाजपने भाजप-शिंदे गटाचा धुव्वा उडवला!

श्री. पवार यांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर शाखेचे अध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वात राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ पदाधिकारी संघटित झाले. त्यांनी घोषणाबाजीतून श्री. पवार यांना राजीनामा मागे घेण्याची गळ घातली. श्री. पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आहेत. त्यांच्या विचाराने प्रभावित कार्यकर्ते पक्षात सक्रिय आहेत. त्यांनीच जर निवृत्तीची घोषणा केली, तर कार्यकर्ते कुणाकडे पाहून काम करतील.

पक्षातील तरुण पदाधिकाऱ्यांच्या पाठी मागे कोण उभे राहील? श्री. पवार यांच्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षासाठी झोकून काम करीत आहे. राज्यातील सामान्य जनता, शेतकरी, कर्मचारी, मजूर, महिला, तरुण वर्ग मोठ्या अपेक्षेने श्री. पवार यांच्या नेतृत्वाकडे पाहत असतो. राज्यात छत्रपती शिवरायांसह फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेवर श्री. पवार हे प्रामाणिकपणे कार्यरत असतात.

NCP workers at Dhule
Tukaram Munde effect : मुंडे येताच पशुसंवर्धनचे धाबे दणाणले

शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा, राजीनामापत्र मागे घ्यावे, अशी मागणी श्री. भोसले, जोसेफ मलबारी, गोरख शर्मा, रईस शेख, मंगेश जगताप, भालचंद्र पाटील, भिका नेरकर, भानुदास लोहार, रईस काझी, राजेंद्र चितोडकर, राजेंद्र सोलंकी, महेंद्र जगताप, महेंद्र बागूल, राजेंद्र चौधरी, महेंद्र शिरसाट, उमेश महाजन, सलीम शेख, अमीन शेख, प्रसाद दाळवाले, अझर पठाण, मंगला मोरे, स्वामिनी पारखे आदींनी केली.

पवारांच्या नेतृत्वाची गरज

माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले, की शरद पवार यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसची कल्पना करणे अवघड आहे. किमान दोन वर्षे म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मजबूत होईल.

NCP workers at Dhule
Sharad Pawar Retirement ; आज नेमकं काय घडलं, त्याचे परिणाम काय ? | NCP | Sarkarnama

देशपातळीवर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ते आणखी प्रभावीपणे काम करू शकतात. वय आणि शारीरिक अडचणीमुळे अध्यक्षपदाचा भार कमी करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वतःकडे ठेवून कार्याध्यक्ष नेमता येईल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेबरोबर धुळे जिल्ह्यातून सर्वप्रथम सोबतीला असणारे डॉ. देशमुख यांनी मांडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com