Sakri Bazar Samiti : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीत भाजप नेते शिवाजीराव दहीते यांच्या बळीराजा विकास पॅनलने १८ पैकी १६ जागा जिंकत बाजार समितीवर आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. भाजप नेत्यांच्या शेतकरी विकास पॅनलला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. बाजार समितीची निवडणूक यंदा मोठी चुरशीची झाली होती, यात काल ८२.७२ टक्के मतदान झाल्यानंतर रात्री उशिरा बाजार समिती कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. (Shivajirao Dahite taken a help of Congress & Shivsena for APMC election)
साक्री (Sakri) बाजार समिती निवडणुकीत (APMC election) भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते शिवाजीराव दहिते यांच्या सोबत काँग्रेसचे (Congress) नेते माजी खासदार डी. एस. अहिरे, वसंत सुर्यवंशी आणि शिवसेनेचे (Shivsena) विशाल देसले हे नेते होते. त्यांच्या विरोधात सुरेश पाटील यांनी शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांसह विविध नेत्यांना बरोबर घेत पॅनेल केले होते. त्यात एका भाजपला महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) तर दुसऱ्या गटाला युतीचा पाठींबा होता. त्यात दहिते गटाने बाजी मारली.
दहितेंची पकड कायम
साक्री तालुक्याच्या राजकारणावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांची पकड कायम असल्याचे या निकालातून पुन्हा एकदा दिसून आले. यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार मंजुळा गावित, ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांनी श्री. दहिते यांच्या विरोधकांना सोबत घेऊन शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून चांगली लढत दिली, मात्र यात त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही.
श्री. दहिते यांनी काँग्रेसचे माजी खासदार बापू चौरे, डी. एस. अहिरे, शिवसेना शिंदे गटाचे विशाल देसले यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन बळीराजा विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेले होते. गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील राजकारणावर आपली पकड ठेवून असलेल्या श्री. दहिते यांना या निवडणुकीत आवाहन मिळेल असे चित्र उभे केले जात असताना या निकालात मात्र त्यांनी १८ पैकी १६ जागा जिंकत तालुक्याच्या राजकारणावरची आपली पकड कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.
बळीराजा विकास पॅनलचे विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते, सेवा सहकारी संस्था मतदार संघ : ऋतुराज ठाकरे (४७४). नंदकुमार खैरनार (४६९), शाईराम अहिरे (४५७), भानुदास गांगुर्डे (४५६), लादूसिंग गिरासे (४४७), दीपक साळुंके (४३८), बन्सीलाल बाविस्कर (४२७). सेवा सहकारी संस्था महिला राखीव : कलाबाई बेडसे (५४५), जिजाबाई साबळे (५२३), सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय : रवींद्र ठाकरे (५४५), अनुसूचित जमाती : वसंत पवार (५९८), ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण : मुकुंदराव घरटे (७२७). अनुसूचित जाती/जमाती : ओंकार राऊत (७८२), व्यापारी व अडते मतदारसंघ : किरण कोठावदे (१०८५), राजेंद्र शहा (९०३), हमाल व तोलारी मतदारसंघ : दिनकर बागूल (२५८).
शेतकरी विकास पॅनलच्या विजयी उमेदवारांत ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण : जितेंद्र बिरारीस (७७६), ग्रामपंचायत मतदारसंघ आर्थिक दुर्बल घटक : भास्कर पवार (७६४) यांचा समावेष आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.