युक्रेनहून परतलेल्‍या विद्यार्थ्यांना अमित देशमुखांनी दिला डिजिटल मंत्र!

मंत्री अमित देशमुख यांच्‍या हस्‍ते आज होणार उपक्रमाचे उद्‌घाटन
Amit Deshmukh
Amit DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : युद्धजन्‍य परिस्‍थितीमुळे युक्रेन (Ukrain) येथे वैद्यकीय शिक्षण (Medical Education) घेणारे विद्यार्थी मायदेशी परतले होते. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने Health University) तात्पुरता व ऐच्छिक स्वरूपाचा तीन महिन्यांचा डिजिटल कंटेन्ट उपलब्ध करून दिला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा विद्यापीठाचे प्रति-कुलपती अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्‍या हस्‍ते आज ऑनलाइन होणार आहे.

Amit Deshmukh
कादवा साखर कारखान्याचे बॅास श्रीराम शेटेच, विरोधकांना भोपळा!

या कार्यक्रमास विद्यापीठाच्‍या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण उपस्थित राहतील.

यासंदर्भात डॉ. कानिटकर म्‍हणाल्‍या, की राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून व शासनाच्या पाठबळामुळे डिजिटल कंटेन्ट तयार करणे शक्य झाले. युद्धामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठ व इल्सेविअर संस्थेतर्फे डिजिटल कंटेन्ट तयार केला आहे. या माध्यमातून ऐच्छिक व ऑनलाइन शिक्षण विद्यार्थी घेऊ शकतात.

Amit Deshmukh
आमदार कोकाटे समर्थकांनी पराभवाची परतफेड केली

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून MUHS App तयार केले आहे. सर्वच क्षेत्रात डिजिटल उपकरणांचा वापर होत आहे. शैक्षणिक क्षेत्रात, तसेच विद्यापीठातर्फे घडणाऱ्या घडामोडी विद्यार्थी, शिक्षक, पालक व अभ्यागतांना स्मार्ट मोबाईलवर उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठाकडून ॲप विकसित केले आहे.

ऑनलाइन शिक्षणासाठी नोंदणी आवश्‍यक

कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्‍हणाले, की ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थी नोंदणी करू शकतात. नोंदणीकृत विद्यार्थ्यांना डिजिटल कंटेन्ट निशुल्क उपलब्ध होणार आहे. विद्यापीठाने सामाजिक दायित्व लक्षात घेऊन ऑनलाइन शिक्षणासाठी प्रयत्न केला आहे. ऑनलाइन शिक्षणाचा विद्यार्थ्यांना भविष्यात परीक्षा, नोंदणी, अध्ययन पूर्ण केल्याचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही. अथवा सांगता येणार नाही, याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी. हा डिजिटल कंटेन्ट वापरताना अडचणी आल्यास इल्सेविअरचे अधिकारी अमित मोदी, अंकुश रॉय, रविराज शिंगारे, राहुल सिंह मार्गदर्शन करतील.

ॲपमध्ये ही असेल माहिती

आरोग्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट फोनमधील प्ले-स्टोअरवर उपलब्ध असलेल्या MUHS App ॲपद्वारे विद्यापीठाची माहिती, व्हीजन डॉक्युमेंट, बृहत् आराखडा, राष्ट्रीय सेवा योजनांची माहिती, विविध उपक्रम, आंतरवासीयता योजनांसंदर्भात माहिती, डिजिटल लायब्ररी, शिक्षक व विद्यार्थ्यांना संशोधनासाठी देण्यात येणारे अनुदान आदींची माहिती उपलब्‍ध होईल.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com