Dilip Borse Politics : भाजपला मतांची आघाडी, तरीही आमदार दिलीप बोरसेंची चिंता का वाढली?

Fight for Survival For BJP Dilip Borse : बागलाण विधानसभा मतदारसंघात यंदा भाजप आमदार बोरसे यांची अस्तित्वाची लढाई?
Dilip Borse Politics
Dilip Borse Politics Sarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Sharad Pawar News : भाजपचे उमेदवार डॉ सुभाष भामरे यांना बागलाण मतदारसंघातून आघाडी मिळाली आहे. मात्र आदिवासी भागात भाजपला मते मिळालेली नाही. त्यामुळे येथील आमदार दिलीप बोरसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

बागलाण हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये येथे भाजपचे उमेदवार डॉ सुभाष भामरे यांना आघाडी मिळाली आहे. ही आघाडी यंदाच्या निवडणुकीत कमी करण्यात काँग्रेसच्या उमेदवार डॉ शोभा बच्छाव यशस्वी झाल्या.

विशेष म्हणजे भाजपला (BJP) विधानसभा मतदारसंघात आघाडी आहे. मात्र डांगसौंदाणे, मुल्हेर या भागात भाजपचा प्रभाव कमी झाला येथे 35 हजार 719 मतदान झाले. यामध्ये काँग्रेसच्या बच्छाव यांना 29 हजार मते मिळाली. भाजपला केवळ 6,711 मते आहेत.

भारतीय जनता पक्षाकडे बागलाण तालुक्यातील डॉ विलास बच्छाव, निवृत्त पोलिस अधिकारी प्रताप दिघावकर, आबा बच्छाव हे तीन प्रमुख इच्छुक होते. भाजपचे विविध पदाधिकारी या भागात आहेत. असे असतानाही आदिवासी भागात या पक्षाची पीछेहाट झाल्याचे दिसून आले.

Dilip Borse Politics
Rajendra Vikhe : राजेंद्र विखेंची पोस्ट चर्चेत; 'शतरंज का शौकीन नहीं था, इसलिए धोखा खा गया...'

बागलाण हा आदिवासी राखीव मतदारसंघ आहे. भाजपचे आमदार बोरसे यांनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या दीपिका चव्हाण यांचा पराभव केला होता. यंदाही याच दोन उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे.

आदिवासी बहुल भागातील मतदार भाजपवर नाराज असल्याचे चित्र आहे. त्यात विकास कामे आणि आदिवासी आरक्षणात इतरांची घुसखोरी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा संवेदनशील विषय भाजपची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

Dilip Borse Politics
Asif Shaikh Politcal News : जगातील सर्वात मोठ्या भाजपचे 'या' मतदारसंघात नेहमीच होते डिपॉझिट जप्त

राष्ट्रवादी काँग्रेसने येथे मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक भाजपचे आमदार बोरसे यांच्यासाठी अस्तित्वाची निवडणूक ठरू शकते. त्या दृष्टीने आमदार बोरसे सध्या 'रेड झोन'मध्ये आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com