Raj Thakre politics: राज ठाकरेंना नाशिकमध्ये धक्का; दिलीप दातीर यांचा राजीनामा!

Dilip Daatir; MMS leader Dilip Datir resigns, shock for MNS in Nashik-नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या दातीर यांच्या राजीनाम्याने खळबळ
Dilip Datir & Dinkar Patil
Dilip Datir & Dinkar PatilSarkarnama
Published on
Updated on

Dilip Dadir News: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. सध्या ते उमेदवारांच्या शोधात आहेl. असे असताना; नाशिकमध्ये मात्र त्यांना धक्का बसला आहे.

नाशिक पश्चिम मतदार संघातून गतवर्षी मनसेचे महानगर प्रमुख दिलीप दातीर यांनी उमेदवारीची घोषणा केली होती. मनसेचे पहिले उमेदवार म्हणून त्यांची चर्चा होती. दातीर यांनी यापूर्वी देखील नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन मनसेतर्फे विधानसभेची निवडणूक लढविली होती.

आता मात्र त्यांनी ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. दोन दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचे महापालिका सभागृह नेते दिनकर पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी लगेचच मनसेचा झेंडा हाती घेतला.

या निर्णयानंतर पक्षप्रमुख ठाकरे यांनी त्यांना नाशिक पश्चिम मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली. दिनकर पाटील हे देखील भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार होते. यापूर्वी त्यांनी मतदारसंघात अन्य इच्छुकांसह बैठका घेऊन भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती.

Dilip Datir & Dinkar Patil
Narhari Zirwal politics: राष्ट्रवादीचे ठरेना; महायुतीत बंडखोरी, धनराज महालेंचे झिरवाळ यांना आव्हान!

भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांना त्यांनी थेट आव्हान दिले होते. मात्र भाजपने त्याची फारशी दखल न घेता आमदार हिरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. या पार्श्वभूमीवर मनसेला लाभ झाला, असे वाटत होते.

श्री. पाटील यांच्या मनसे प्रवेशाला चोविस तास उलटण्याआधीच मोठा धक्का मनसेला बसला आहे. श्री. दातीर यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे मनसेमध्ये खळबळ उडाली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्याशी संपर्क केल्याचे कळते. मात्र श्री दातीर यांनी त्याला प्रतिसाद दिलेला नाही.

विधानसभा निवडणुकीत पश्चिम मतदारसंघात उमेदवार जाहीर करताच मनसेला त्यांच्याच पदाधिकाऱ्याने झटका दिला आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या आमदार हिरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे आव्हान आहे. दोन्ही प्रमुख आघाड्यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहे.

Dilip Datir & Dinkar Patil
Manikrao koKate Politics: आमदार माणिकराव कोकाटे कोट्याधीश, पत्नी त्यांच्याहूनही अधिक श्रीमंत!

मनसे आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. कामगार नेते आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉक्टर डी. एल. कराड यांनी देखील महाविकास आघाडीला आव्हान देत पक्षातर्फे उमेदवारी अर्ज केला आहे. त्यामुळे सध्या या मतदारसंघात आणखी किती उमेदवार रिंगणात उतरतात, याची सध्या चर्चा आहे..

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com