Narhari Zirwal politics: राष्ट्रवादीचे ठरेना; महायुतीत बंडखोरी, धनराज महालेंचे झिरवाळ यांना आव्हान!

Narhari Zirwtal; Shivsena Shinde Group's Ex MLA Dhanraj Mahale Rebels-विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना महायुतीतून बंडखोरांचे मोठे आव्हान.
Dhanraj Mahale & Narhari Zirwal
Dhanraj Mahale & Narhari ZirwalSarkarnama
Published on
Updated on

Zirwal Vs Mahale: विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात उमेदवार कोण हे महाविकास आघाडीचे भिजत घोंगडे आहे. महायुतीत मात्र आमदार नरहरी हिरवाळ यांचा मार्ग रोखायचाच असा निर्धार व्यक्त झाला आहे. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघात यंदा बंडखीरेचे वारे वाहू लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नरहरी झिरवाळ यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. झिरवाळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्याआधीच महायुतीत झिरवाळ यांना आव्हान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आज भास्कर गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

महायुतीचा प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माजी आमदार धनराज महाले यांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला. यंदाच्या निवडणुकीत नरहरी झिरवाळ यांना कोणत्याही परिस्थितीत विधानसभेत जाऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीचे ठरत नसताना आमदार झिरवाळ यांना घरातूनच विरोध झाला आहे. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघाची निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. आमदार झिरवाळ यांच्या मार्गात यंदा अनेक अडथळे आहेत.

Dhanraj Mahale & Narhari Zirwal
Suhas Kande: महायुतीत वाद पेटला; आमदार कांदेंचा भुजबळांवर गंभीर आरोप; म्हणाले,'मला पैशाच्या ऑफर, धमक्या...

विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुख्य फळी त्यांच्यासोबत नसेल. दिंडोरी तालुक्यात सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोबतीला महाविकास आघाडीचे बहुतांशी पक्ष आणि नेते आहेत.

महाविकास आघाडीकडे माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनिता चारोस्कर या प्रमुख इच्छुक आहेत. याशिवाय प्रा. अशोक बागुल, संतोष रेहरे, स्वप्नील गायकवाड आणि भास्कर गावित व अन्य काही उमेदवारांनी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अद्याप उमेदवार कोण हे निश्चित केलेले नाही. मात्र आज जाहीर होणाऱ्या दुसऱ्या यादीत दिंडोरीच्या उमेदवाराचा समावेश असेल अशी अपेक्षा आहे. महायुतीत आमदार झिरवाळ हे प्रमुख उमेदवार आहेत. त्यांना यंदा हॅट्रिक करण्याची संधी आहे.

Dhanraj Mahale & Narhari Zirwal
Manikrao koKate Politics: आमदार माणिकराव कोकाटे कोट्याधीश, पत्नी त्यांच्याहूनही अधिक श्रीमंत!

राज्यातील महत्त्वाचे पद त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मिळाले होते. त्यानंतर झालेल्या बंडखोरीत त्यांनी अजित पवार यांना साथ दिली. त्यामुळे काही प्रमाणात सहकारी पक्ष त्यांच्यावर नाराज आहेत. ही नाराजी दूर करण्यात ते यशस्वी होतील, असा त्यांचा दावा आहे.

या सर्व राजकीय गोंधळात दिंडोरी मतदारसंघाची निवडणूक अधिक चुरशीची होईल अशी चिन्हे आहेत. महायुतीत बंडखोरी झाली, तशीच बंडखोरी महाविकास आघाडीत देखील होण्याची चिन्हे आहेत. या इच्छुक उमेदवारांना एकत्र बसून त्यांचे प्रबोधन करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना फारसे स्वारस्य दिसत नाही. त्यामुळे दोन्ही प्रमुख उमेदवारांना यंदा एकमेकांच्या विरोधकांपेक्षा स्व पक्षातील बंडखोरांशीच लढावे लागणार आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com