Harishchandra Chavan: पाच वर्षांत आज माझी आठवण आली का? दिंडोरीत आजी-माजी खासदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप

Dindori Constituency 2024: भाजपच्या उमेदवार पवार यांना आपला अजिबात पाठिंबा नाही. त्यांच्या प्रचारात मी सहभागी होणार नाही, असे त्यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमांवर चव्हाण प्रचार दौऱ्यात सहभागी होणार असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत.
Harishchandra Chavan, Bharti Pawar
Harishchandra Chavan, Bharti PawarSarkarnama

Dindori News: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात (Dindori Constituency 2024) भाजपला पक्षांतर्गत आव्हान आहे. उमेदवार डॉ. भारती पवार (MP Bharti Pawar) यांच्या प्रचारापासून भाजपचे अनेक पदाधिकारी दूर आहेत. आता माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीही त्यांना घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत भारतीय जनता पक्षात विद्यमान आणि माजी खासदारामध्ये (BJP politics) आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिंडोरी मतदारसंघातून बंडखोरीचे संकेत दिले आहेत. गेले दोन आठवडे ते मतदारसंघाचा दौरा करून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत.

या दौऱ्यात त्यांना अनेक कार्यकर्त्यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या भाजपच्या उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच माजी खासदार चव्हाण यांनी डॉ. पवार यांना आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे डॉ. पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

माजी खासदार चव्हाण म्हणाले, "दिंडोरी मतदारसंघात (Dindori Constituency 2024) भारतीय जनता पक्ष केव्हा होता? या मतदारसंघात भाजपची उभारणी माझ्या कारकिर्दीत अतिशय कष्ट घेऊन केली आहे. सर्व घटकांची व राजकीय कार्यकर्ते नेत्यांशी चांगले संबंध निर्माण करून भाजपसाठी ही जागा जिंकत आलो होतो. मात्र, पक्षाला आपला विसर पडला. गेल्या पाच वर्षात भाजपच्या नेत्यांनी एकदाही आपल्याशी संपर्क केला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

समाज माध्यमांवर माजी खासदार चव्हाण भाजपच्या राज्यमंत्री डॉ. पवार यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याच्या बातम्या आहेत. पत्रकावर त्यांचे नावदेखील टाकण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी संताप व्यक्त केला. भाजपच्या उमेदवार पवार यांना आपला अजिबात पाठिंबा नाही. त्यांच्या प्रचारात मी सहभागी होणार नाही, असे त्यांनी म्हटलं आहे.

समाज माध्यमांवर चव्हाण प्रचार दौऱ्यात सहभागी होणार असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. त्याबद्दलदेखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. डॉ. भारती पवार यांना गेली पाच वर्षे माझी आठवण आली नव्हती. माझ्या अनेक समर्थकांवर या कालावधीत अन्याय झाला. त्यामुळे आपण भाजपच्या प्रचारापासून अलिप्त असल्याचे त्यांनी सांगितले.

Harishchandra Chavan, Bharti Pawar
Sunil Chavan Join BJP: धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव सुनील चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार

सुरगाणा, पेठ हे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे कार्यक्षेत्र आहे. या भागातील पदाधिकारी नियुक्त करण्याच्या वेळी चव्हाण यांना विश्वासात घेण्यात आले नाही. त्यांनी सुचविलेल्या पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आले. अगदी पक्षाच्या होर्डिंगवर त्यांचे छायाचित्रदेखील नसायचे. हे सर्व कार्यकर्ते आणि मतदारांना आवडलेले नाही. याबाबत अनेकांनी आपल्याकडे येऊन नाराजी व्यक्त केली आहे. हे सर्व लोक भाजपच्या प्रचारापासून अलिप्त आहेत. भारतीय जनता पक्षाच्या खासदार म्हणून काम करायला हवे होते. सगळ्यांना विश्वासात घेणे अपेक्षित होते. तसे झालेले नाही. त्याचा फटका पक्षाला या निवडणुकीत बसेल अशी स्थिती आहे, असे चव्हाण म्हणाले.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com