Dr. Rahul Aher: आमदार राहुल आहेर यांना चांदवडकरांनी दाखवला हिसका...

Dindori Lok Sabha 2024 Result Analysis: भास्कर भगरे यांना ५६ हजार ३६४ तर भाजपच्या डॉ. पवार यांना ५२ हजार २७३ मते आहेत. भाजप येथे चार हजार मतांनी पिछाडीवर आहे.आहेर यांना चांदवडच्या मतदारांनी हिसका दिला आहे.
Dr. Rahul Aher
Dr. Rahul AherSarkarnama

Dindori News: दिंडोरी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ. भारती पवार यांना कांदा प्रश्नामुळे मोठा झटका बसला. त्यांचा पराभव झाला. तरीही कांदा आंदोलनाचे केंद्र असलेल्या चांदवड- देवळा मतदारसंघात त्या 16 हजार 747 मतांनी आघाडीवर राहिल्या.

डॉ. भारती पवार यांना लोकसभेच्या निवडणुकीत चांदवडमधून सोळा हजारांची आघाडी मिळाली. प्रत्यक्षात मात्र मतदारांनी भाजपचे आमदार राहुल आहेर (Dr. Rahul Aher) यांना सुचक इशारा देत देवळा शहरापुरते मर्यादित ठेवले आहे.

चांदवड-देवळा मतदार संघात भाजपला मिळालेल्या आघाडीचा आनंद फार काळ टिकला नाही. या मतदारसंघातील मतांचे विश्लेषण वेगळेच सांगून गेले. मतदारसंघात आघाडी असली तरी ती देवळा तालुक्यापूर्तीच मर्यादित आहे. आमदार आहेर यांच्यासाठी हा मोठा इशारा आहे. आगामी राजकीय वाटचालीत त्यांना राजकीय धक्का बसू शकतो.

चांदवड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांना ५६ हजार ३६४ तर भाजपच्या डॉ. पवार यांना ५२ हजार २७३ मते आहेत. भाजप येथे चार हजार मतांनी पिछाडीवर आहे.आहेर यांना चांदवडच्या मतदारांनी हिसका दिला आहे.

या मतदारसंघात चांदवड आणि देवळा हा सामाजिकदृष्ट्या भिन्न कल असलेल्या मतदारांचा मतदारसंघ आहे. भाजपचे डॉ.आहेर हे दोन वेळा विजयी झाले आहे. मात्र त्यांना आघाडी देवळातून मिळते चांदवडमध्ये डॉ आहेर मागेच राहिलेले आहेत.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार शिरीष कोतवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सयाजी गायकवाड, संजय जाधव, नितीन आहेर या नेत्यांनी भाजपच्या डॉ. आहेर यांना मर्यादित ठेवण्यात यश मिळवले.

Dr. Rahul Aher
K. P. Patil: वाकोबाला साकडं घालून शड्डू ठोकला; के. पी. पाटील हाच पक्ष म्हणून लागले कामाला..

आगामी विधानसभा निवडणुकीत डॉ. आहेर यांना त्यांच्या घरातूनच केदा आहेर यांचे मोठे आव्हान आहे केला आहे.यंदा विधानसभेसाठी भाजपचे प्रबळ इच्छुक उमेदवार आहेत. अशा स्थितीत भाजपला घरातूनच मोठे आव्हान मिळू शकते. त्यामुळे डॉ. आहेर यांना लोकसभेच्या निवडणुकीने चांदवडी हिसका दाखवत देवळ्या पुरते मर्यादित केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com