Girish Mahajan : दिनकर पाटील यांचा आरोप, "गिरीश महाजन यांनी मला पाच वेळा फसवले"

Dinkar Patil Serious allegations against Minister Girish Mahajan: उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा कोणीही नेता मोठा होऊ नये, असा मंत्री गिरीश महाजन यांचा प्रयत्न असतो, अशी टिका बंडखोर उमेदवार पाटील यांनी केली.
Girish Mahajan & Dinkar Patil
Girish Mahajan & Dinkar PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024: भाजपचे बंडखोर आणि मनसेचे उमेदवार, भाजपचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी खळबळ जनक दावा केला आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केला. त्यामुळे श्री पाटील चर्चेत आले आहेत.

श्री पाटील हे लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपचे इच्छुक उमेदवार होते. त्यांनी पक्षाकडे जोरदार पाठपुरावा देखील केला होता. मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडाचा झेंडा उभारला. मनसे पक्षात प्रवेश करून भाजपच्या सीमा हिरे यांच्या विरोधात उमेदवारी करीत आहेत.

Girish Mahajan & Dinkar Patil
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे यांनी कोणाला हिणवले, "आम्ही हप्ते देतो, घेत नाही"

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशातच श्री पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपाने खळबळ उडाली आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजपचा कोणताही नेता मोठा होऊ नये, यासाठी महाजन त्यांचे प्रयत्न असतात. भाजपने केलेल्या सर्वेक्षणात विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्यापेक्षा माझी लोकप्रियता आणि निवडून येण्याची क्षमता अधिक होती, असा दावा त्यांनी केला.

Girish Mahajan & Dinkar Patil
Hasan Mushrif : पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिले मराठा आरक्षणाला पाठबळ - दत्ताजीराव देसाई

श्री पाटील म्हणाले, मी 1992 पासून महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येत आहे. त्यामुळे विधानसभेच्या उमेदवारीवर माझा हक्क होता. पक्षाने केलेल्या निवडणूक सर्वेक्षणात मला 42 टक्के तर विद्यमान आमदार सीमा हिरे यांना अवघी बारा टक्के पसंती होती. मात्र तरीही आमदार हिरे यांना उमेदवारी देऊन मंत्री महाजन यांनी माझ्यावर अन्याय केला. त्यासाठी त्यांनी दिशाभूल करणारे दावे देखील केले, असा आरोप पाटील यांनी केला.

भारतीय जनता पक्षाने नाशिकचे नेतृत्व महाजन यांच्याकडे सोपविले आहे. महाजन यांनी पाच वेळा मला उमेदवारीचे आणि अन्य आश्वासने दिली होती. मात्र त्यातील एकाचेही पालन झालेले नाही. तरीही मी पक्षासोबत प्रामाणिकपणे राहिलो. मात्र मला बंडखोरीसाठी प्रवृत्त करण्यात आले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत मी इच्छुक होतो. तेव्हा भाजपचे नेते माझ्या निवासस्थानी आले. त्यांनी मला महापदाची संधी देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर मी प्रामाणिकपणे पक्षाचे काम करून माझ्या प्रभागातून ११ हजार मते सीमा हिरे यांना मिळवून दिली. मात्र पक्षाने महापौर पदासाठी माझ्या ऐवजी सतीश कुलकर्णी यांना संधी दिली.

महापौर पदाच्या निवडणुकीत माझ्यावर अन्याय झाला त्यावेळी भाजप नेत्यांनी तुम्ही लोकसभा निवडणुकीची तयारी करा तुम्हाला पक्षातर्फे उमेदवारी देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्याचे वारंवार स्मरण करून दिले जात होते. त्यामुळे पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले. मात्र पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या निवडणुकीतही मला टाळण्यात आले.

त्यामुळे हा अन्याय मी सहन करू शकत नाही. येत्या निवडणुकीत मी किमान २५ हजार मतांनी भाजपच्या आमदार हिरे यांचा पराभव करीन, असा दावाही पाटील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com