Nashik Graduate Election: आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी होणार!

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जळगाव येथे नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा आढावा घेतला.
Radhakrishna Game
Radhakrishna GameSarkarnama

जळगाव : नाशिक (Nashik) विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल, अशी दक्षता घ्यावी. मतदान केंद्रांवर मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे (Dr. Radhakrishna Game) यांनी येथे दिल्या. (Code of conduct will be impliment seriously)

Radhakrishna Game
Dr Amol kolhe; खासदार कोल्हे रमले `शिवपुत्र संभाजी महानाट्या`च्या प्रचारात

येत्या ३० जानेवारीस सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत जळगाव जिल्ह्यातील ४० मतदान केंद्रांवर या निवडणुकीसाठी मतदान होईल. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त गमे मंगळवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते.

Radhakrishna Game
Telangana News : विरोधकांची मोठ बांधायला सुरुवात ; काँग्रेस वगळून तिसऱ्या मोर्चासाठी..

श्री. गमे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीशी संबंधित नोडल अधिकाऱ्यांची बैठक झाली. तीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, महापालिका आयुक्त देविदास पवार, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, रवींद्र भारदे, प्रसाद मते, किरण सावंत-पाटील, राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

श्री. गमे म्हणाले, की मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करावा. त्यासाठी कृती आराखडा तयार करावा. मतदान केंद्रांवरील दळण- वळण सुविधांचा आढावा घ्यावा. मतदान झाल्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया समजून घ्यावी. त्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षण वर्ग आयोजित करावा. मतदान व मतमोजणीसाठी सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करावेत. त्यांचेही प्रशिक्षण घ्यावे. मतपेट्या तपासून घ्याव्यात. मतदान साहित्य ताब्यात देताना आवश्यक ती काळजी घ्यावी. सर्व नोडल अधिकऱ्यांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारीचे तंतोतंत पालन करावे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर आवश्यक ती दक्षता घ्याव्यात.

जिल्हाधिकारी मित्तल यांनी निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता पालनाच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती दिली. पोलिस अधीक्षकांनी पोलिस बंदोस्ताचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. निवडणुकीसाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. मतदान केंद्रे निश्चित केले आहेत. तेथे मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांचा पहिला प्रशिक्षण वर्गही झाला आहे. मतदान साहित्यवाटप व मतपेट्या वाहतुकीचे नियोजन करण्यात आल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी हुलवळे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com