शशिकांत शिंदेचे टेन्शन कमी होईना : रांजणेंनी धुडकावली राष्ट्रवादीची ऑफर!

शरद पवार यांनी मकरंद पाटील व शिवेंद्रसिंहराजेंशी संपर्क करुन आमदार शिंदेंचा मार्ग मोकळा करण्याची सूचना केली.
nyandev Ranjane, Shashikant Shinde
nyandev Ranjane, Shashikant Shindesarkarnama
Published on
Updated on

सातारा : जावळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आमदार शशिकांत शिंदेंविरोधात (Shashikant Shinde) आव्हान निर्माण करणाऱ्या ज्ञानदेव रांजणे यांची समजूत काढण्यासाठी आज दिवसभर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खल सुरु होता. दुपारी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinhraje Bhosale) यांनी रांजणे यांच्या घरी जाऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच रांजणे यांना स्वीकृत संचालक करण्याची ऑफर दिली. मात्र, राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे व ज्ञानदेव रांजणे यांनी मतदारांसोबत पत्रकारांशी संवाद साधत दोन वर्षे रांजणे हे सोसायटीतून संचालक राहतील, शिंदेंना स्वीकृत म्हणून घ्यावे. त्यानंतर चार वर्षांनंतर आमदार शिंदेंना सोसायटीतून निवडून दिले जाईल, त्या वेळी रांजणे यांना स्वीकृत संचालक करावे, अशी उलट ऑफर दिली. त्यावर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन यावर निर्णय घेतला जाईल, असे रामराजे व मकरंद पाटील यांनी सांगितले. (Dnyandev Ranjane rejected the offer of NCP)

nyandev Ranjane, Shashikant Shinde
विधान परिषदेची उमेदवारी न मिळालेल्या राहुल आवाडेंना आता लोकसभेची ऑफर!

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत जावळी मतदारसंघांवर सगळ्याचेच लक्ष केंद्रीत आहे. जावळीतून कोणत्याही परिस्थितीत शिंदेंना संचालक होण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून चर्चेचा खल सुरु होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मकरंद पाटील व शिवेंद्रसिंहराजेंशी संपर्क करुन आमदार शिंदेंचा मार्ग मोकळा करण्याची सूचना केली होती. त्यानंतर दिवसभर चक्रे फिरत होती. रांजणे यांचे मन वळविण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंनी प्रयत्न केले. त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर, मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, अनिल देसाई हे रांजणे यांची मनधरणी करण्यासाठी जावळीतील त्यांच्या घरी गेले होते. या वेळी वसंतराव मानकुमरेही उपस्थित होते. रांजणे यांच्या घरी तासभर या सर्वांची बंद खोलीत चर्चा झाली. यामध्ये रांजणे यांनी रिंगणातून माघार घेत शिंदेंना त्यांच्याकडील मते द्यावीत, त्यांचा संचालक होण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी अपेक्षा ठेवली. मात्र, आता हे सर्व प्रकरण फार पुढे गेले आहे, मी मागे येणार नाही, असे सांगितले. त्यावर रामराजेंसह मकरंद पाटील यांनी त्यांना समजावून सांगत रांजणेंना स्वीकृत संचालक करण्याची ऑफर दिली.

मात्र, ही ऑफर धुडकावून लावत त्यांनी चर्चा थांबवली. त्यामुळे बैठक आटोपती घेत राष्ट्रवादीची नेते मंडळी जिल्हा बॅंकेत येऊन थांबली होती. यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य वसंतराव मानकुमरे व ज्ञानदेव रांजणे यांनी २९ मतदारांसमवेत पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्याच नेत्यांना ऑफर दिली. मानकुमरे म्हणाले, शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आम्हाला आदरणीय असून आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. त्यांचा आम्हाला अवमान करायचा नाही. मात्र, शिंदेहे दोन पंचवार्षिक संचालक आहेत. यावेळेला आमच्या कार्यकर्ते व मतदारांच्या आग्रहास्तव आम्ही रांजणे यांना निवडून आणणार आहोत. शिंदेना आम्ही विनंती केली होती. तालुक्यात शांतता अबाधित रहावी, तुम्ही दोन पंचवार्षिक या तालुक्यातून आमदार राहिला आहात. तुम्ही चांगले ग्रहस्थ आहात. सामान्य माणूस ग्राह्य धरुन त्यांना मोठे करण्याचे काम तुम्ही केले पाहिजे. आता लोकांनीच दुसऱ्या व्यक्तीला संधी देण्याचा निर्णय केला असून रांजणे यांना बहुमत देण्याचा निर्णय झाला आहे.

nyandev Ranjane, Shashikant Shinde
शशीकांत शिंदेंसाठी शरद पवारांचा शिवेंद्रसिंहराजे, मकरंद पाटलांना फोन...

त्यांनी रांजणे यांना स्वीकृतची ऑफर दिली आहे. मात्र, आम्ही त्यांना एक पर्याय दिला आहे. रांजणे यांना पहिले एक वर्षे सोसायटीतून संचालक होऊ द्यात. त्यानंतर चार वर्षांनी त्यांना स्वीकृत संचालक करा. त्यानंतर शिंदे यांना पुन्हा सोसायटीतून संधी द्या, अशी ऑफर दिली आहे. त्यावर त्यांनी आम्ही वरिष्ट नेत्यांशी बोलून कळवतो, असे सांगितले. मात्र, आम्ही उद्या मतदान करणार आहोत. २८ मतदार आमच्यासोबत असून आणखी तीन मतदार असे ३१ मतदार एकत्र येऊन रांजणे यांना मतदान करणार आहोत. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे नम्र व चांगले नेतृत्व आहे. त्यांनी कोणताही अट्टाहास केलेला नाही. त्यांनाही जावळीत संघर्ष नको आहे. त्यांची भूमिका चांगली आहे. शिवेंद्रसिंहराजेंप्रमाणेच शिंदे यांनीही भूमिका घ्यावी. त्यांच्याशी आम्हाला कोणताही वाद घालायची नाही. त्यांनी आजचा शेवटचा दिवस गोड करुन आमच्या उमेदवाराला पाठींबा द्यावा व आपला उमेदवार बिनविरोध निवडून द्यावा, अशी अपेक्षा मानकुमरे यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com