Chhagan Bhujbal: `जरा धीर धरा आपले दिवस परत येतील`

छगन भुजबळ यांच्या हस्ते रानवड साखर कारखान्याच्या ४० व्या गळीत हंगामाची सुरवात झाली.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : महाराष्ट्र (Maharashtra) कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र महाराष्ट्र कमकुवत होणार नाही. दिल्लीला (Delhi) देखील आधार देण्याचं काम महाराष्ट्र करतो हे कुणीही विसरू नये अशी टीका करत महाराष्ट्र कधी झुकला नाही झुकणारही नाही. (Maharashtra will not bend in front of delhi) दिवस येतात आणि दिवस जातात जरा धीर धरा आपले दिवस परत येतील (Our days will be back) असा सबुरीचा सल्ला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शेतकरी मेळाव्या प्रसंगी उपस्थितांना दिला. (Maharashtra will never bend in front of delhi yet & In any case)

Chhagan Bhujbal
तेजोमय दीपावलीत उज्ज्वल भविष्याची बीजे..!

येथील ‘कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याच्या ४० व्या गळीत हंगामाचा प्रारंभ श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

Chhagan Bhujbal
अस्वस्थ गुलाबराव म्हणाले, `या रवी राणांना कोणी तरी आवर घाला`

यावेळी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, आमदार सुहास कांदे, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, मविप्रचे सरचिटणीस अॅड नितीन ठाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, देशात आणि राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आहे. त्याला दिलासा देण्याची केंद्र, राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी. जिल्हाधिकाऱ्यांना नको ते प्रश्न विचारण्यापेक्षा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना काय अडचणी आहे. याची विचारपूस करण्याची गरज आहे अशी टीका त्यांनी केली.

ते म्हणाले, पक्षभेद असले तरी शेतकरी हितासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. निवडणुका आल्यावर आपआपले झेंडे काढू मात्र विकासाच्या कामासाठी एक होऊन काम करूया.

ते पुढे म्हणाले की, निफाड मधील कारखाने सुरू करण्यासाठी आमदार दिलीप बनकर सातत्याने प्रयत्न करत आहेत. शरद पवार व अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे रानवड कारखाना सुरू झाला. या कारखान्याचे खऱ्या अर्थाने चीज बनकर यांनी केले आहे. तसेच आता निफाड साखर कारखाना सुरू करण्यासाठी दिलीप बनकर प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांना सर्वांनी पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. शेतकरी हितासाठी कारखाने सुरू होणे आवश्यक असून शेतकऱ्यांनी संयमाची भूमिका ठेवावी.

नाशिकमधूनच सगळं पाणी पुढे मराठवाड्याकडे जात तरी देखील नाशिकचे कारखाने बंद पडले. आणि मराठवाडा परिसरातील कारखाने मात्र सुरू राहिले अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार दिलीप बनकर यांनी केले.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com