Congress: देशाचा खरा इतिहास पुसू देऊ नका!

येवला येथे काँग्रेसच्या पदयात्रेप्रसंगी स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सन्मान जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांनी केला.
Dr Tushar Shewale in Yeola meeting
Dr Tushar Shewale in Yeola meetingSarkarnama

येवला : सत्ताधारी (Ruling BJP party) देशाचा खरा इतिहास पुसू पाहत आहे. मात्र देश (India) असे होऊ देणार नाही. काँग्रेसला (Congress) स्वातंत्र्य सैनिकांविषयी नेहमीच अभिमान राहिला आहे. त्यामुळेच काँग्रेसतर्फे संपूर्ण देशात आझादी गौरव पदयात्रा व स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मान सोहळा घेतल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे (Dr. Tushar Shewale) यांनी केले. (Congress always have respect of freedpom fighters)

Dr Tushar Shewale in Yeola meeting
Vinod Tawade: महाराष्ट्राच्या राजकारणात नसल्याची अजिबात खंत नाही!

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे क्रांतिदिनानिमित्त आझादी गौरव पदयात्रा व स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सन्मान सोहळा हुतात्मा स्मारक येथे मंगळवारी (ता. ९) झाला. त्या वेळी ते बोलत होते.

Dr Tushar Shewale in Yeola meeting
Dada Bhuse: दादा भुसे यांनी राखली ५४ वर्षांची लाल दिव्याची परंपरा!

डॉ. शेवाळे अध्यसस्थानी होते. सन्मान सोहळा व आजादी गौरव पदयात्रेचे उद्‍घाटन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते, प्रदेश सचिव रमेश कहांडोळे, अनुसूचित जाती- जमाती काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, धर्मराज जोपळे उपस्थित होते. सन्मान सोहळ्याची व आझादी गौरव पदयात्रेची सुरवात स्वातंत्र्यसेनानी सेनापती तात्या टोपे यांच्या पुतळ्यास र अर्पण करून व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली.

स्वातंत्र्यसेनानी यांचे वारसदार शशिकांत गुळसकर, अनिल तरटे, मुकुंद पोफळे, कावेरी दोडे, शैलेश देसाई, राजेंद्र मोहरे, कृष्णकांत गुजराथी, अनिल मुथा, मीरा माळी, गंगाधर लोखंडे, गणेश पराते, अभिजीत भागवत, रवींद्र खैरनार, हृषीकेश पवार आदींचा सन्मान झाला तसेच १९७१ च्या भारत-पाक युद्धात वीरचक्र प्राप्त झालेले कचरू साळवे यांचाही सत्कार झाला.

डॉ. शेवाळे म्हणाले, की स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी तुरुंगवास भोगला. इंग्रजांशी अविरतपणे संघर्ष करून देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या जडणघडणीमध्ये काँग्रेसचे मोलाचे योगदान आहे. सेनापती तात्या टोपे अठराशे सत्तावनच्या लढ्याचे प्रणेते होते. महात्मा गांधीजींनीही अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळून दिले असून, हा इतिहास पुसू देऊ नका.

यावेळी दिगंबर गिते, ज्ञानेश्वर काळे, ॲड. दिलीप कुलकर्णी, तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख, कावेरी दोडे, कृष्णकांत गुजराती, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, नानासाहेब शिंदे, सुरेश गोंधळी, तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख, ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com