Dr Bharti Pawar Politics : डॉ. भारती पवारांनी राहुल गांधींना लक्ष्य केले, आदिवासी अत्याचारावर मौन केव्हा सोडणार?

BJP Leader Targets Rahul Gandhi On Trible Atrocities: काँग्रेसकडून आदिवासींवर होणाऱ्या अत्याचारावर राहुल गांधी यांचे मौन का, काँग्रेस देश संपवायला निघाल्याचा केला आरोप.
Dr Bharti Pawar & Rahul Gandhi
Dr Bharti Pawar & Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Congress News : माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आदिवासींवरील अत्याचारावरून थेट काँग्रेस नेते राहुल गांधी लक्ष्य केले आहे. काँग्रेस पक्ष देश संपवायला निघाला आहे. आदिवासी अत्याचारावरून काँग्रेस केवळ राजकारण करतो.

काँग्रेसकडून आदिवासींवर होणाऱ्या अत्याचारावर काँग्रेस नेते गांधी यांनी मौन बाळघले आहे. देश संपवायला निघालेला काँग्रेस पक्ष आता मुली, माता- भगिनी संपवायला देखील निघाला असा आरोप संतप्त प्रतिक्रिया माजी केंद्रीय कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी दिली आहे.

यासंदर्भात भाजपच्या डॉ. पवार यांनी काँग्रेस पक्षाच्या पदावर असलेल्या लोकांकडून असे गैरप्रकार होत आहेत. दुसरीकडे या पक्षाचे नेते राज्यातील अन्य प्रकरणावर महायुती सरकारला दूषणे देतात. आंदोलन करतात. हे वर्तन दुटप्पी असल्याची टिका त्यांनी केली.

देशभरात नवरात्रौत्सावाची तयारी सुरू आहे. आदिशक्तीची उपासना होत आहे. देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न होत आहेत. शासनाकडून याबाबत कडक पावले उचलण्यात आली आहेत.

Dr Bharti Pawar & Rahul Gandhi
BJP Politics: निवडणुकीच्या तोंडावर 'ड्र्ग्स'चा धमाका, 'चिपड्या' कोणत्या भाजप आमदाराला भोवणार?

मात्र युवक काँग्रेसचा शहर अध्यक्ष व संशयीत आरोपी अमोल लोडे याने १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करत बलात्कार केल्याची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणातील आरोपी अमोल लोडे युवक काँग्रेसचा कोरपना शहर अध्यक्ष आहे.

कॉन्व्हेंट शाळेत शिक्षक असलेल्या लोडे याने १२ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. उन्हाळ्यात ज्युनिअर खाजगी क्लास घेण्याच्या बहाण्याने आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला शाळेत बोलावून अत्याचार केला.

संशयीताने तुझ्या आई-वडिलांना जीवानिशी मारून टाकेन, अशी धमकी देखील दिली. मात्र, पीडित मुलीने मैत्रिणीकडे या घृणीत प्रकरणाची वाच्यता केल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी, पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Dr Bharti Pawar & Rahul Gandhi
Radhakrishna Vikhe Vs Balasaheb Thorat : विखे-थोरातांमध्ये जुंपली; थोरातांनी आव्हान देताच, मंत्री विखेंनी मक्तेदारीवरच...

चंद्रपूर मध्ये बारा वर्षीय मुलीवर अमोल लोडे नावाच्या नराधमाने दूष्कर्म केले. घडला प्रकार जर कुणाला सांगितला तर तुझ्यासहित तुझ्या आई-वडिलांना सुद्धा मारून टाकेल अशी धमकी नराधम देत होता. त्यामुळे सारवासराव करणारा काँग्रेस पक्ष काय महिलांचे काय संरक्षण करेल याच्या अपेक्षाच काँग्रेस नेते राहुल गांधी कडून नाहीत.

या सर्व घटनेचा निषेध करीत असून आरोपीला अत्यंत कठोर शिक्षा होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी हे सक्षम आहेतच, परंतु देश संपवायला निघालेल्या काँग्रेस पक्षाची मानसिकता किती माता,भगिनी आणि आदिवासींवर अत्याचार करणार याचे उत्तर काँग्रेस पक्ष नेते राहुल गांधी यांती द्यावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com