Dr. Radhakrishna Vikhe Patil News: पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी नाशिककडे वळविण्यासाठी गेली अनेक वर्ष पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक झाली. बैठकीत गोदावरी खोऱ्यात पाणी वळविण्याचा आग्रह धरण्यात आला. यानिमित्ताने नाशिकचे लोकप्रतिनिधी पाण्याच्या प्रश्नावर एकत्र आल्याचे चित्र होते.
गोदावरी एकात्मिक नदी जोड योजना तातडीने राबविण्याची मागणी नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी केली. संदर्भात मंत्रालयात जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला नाशिकच्या पाण्यावरील अधिकार अग्रक्रमाने मांडण्यात आला. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे यावेळी आग्रही दिसले.
दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी तांत्रिक सुधारणा करण्यात याव्या एकदरे धरणाचे पाणी वाघाड करंजवण ओझरखेड आणि तिसगाव धरणात वळविण्यात यावे हा नाशिक साठी सिंचन आणि वाढत्या शहरीकरणावर महत्त्वाचा पर्याय असेल असा दावा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केला.
पार तापी नर्मदा हा आंतरराज्य प्रकल्प केंद्र शासनाकडून रद्द करण्यात आला आहे त्यामुळे नार-पार खोऱ्यातील शिल्लक ९.७६ टीएमसी आणि उपसा सिंचन योजना क्रमांक तीन आणि चार चे अतिरिक्त तीन टीएमसी पाणी एकत्रित करून पार गोदावरी हा एकात्मिक नदी जोड प्रकल्प राबविण्याची मागणी आहे. या प्रकल्पामुळे दिंडोरी, चांदवड, येवला आणि संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर व गंगापूर या आवर्षणग्रस्त तालुक्यांना लाभ होणार आहे.
या प्रकल्पासाठी पायाभूत सुविधा याआधीच उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून या आधीच वितरिका आणि अन्य कामांचे नियोजन झालेले आहे. मांजरपाडा प्रकल्प आणि पार द्वारे गोदावरीचे पाणी पुणे गाव धरणातून थेट पुणे दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे या जिल्ह्याला उपलब्ध होणार आहे. याची सविस्तर मांडणी मंत्री झिरवाळ आणि भुजबळ यांनी यावेळी केली.
या बैठकीला आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार पंकज भुजबळ, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव डॉक्टर संजय बेलसरे, अभियंता प्रकाश मिसाळ आणि गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता शिंगाडे उपस्थित होते.
या निमित्ताने पश्चिम वाहिनी नद्यांचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी हा राजकीय मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. प्रकल्पाला यापूर्वी केंद्र शासनाने मंजुरी नाकारली होती त्यावरून आई निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्ष अडचणीत आला होता. विरोध करणारे नेते देखील महायुती सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे हा प्रकल्प कसा मार्गी लागतो याची उत्सुकता आहे.
--------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.