"आजकालच्या पुढाऱ्यांच्या बापाचं काय जातं तेच समजत नाही"

कळवण मतदारसंघातील विविध विकासकांमाचे भूमिपूजन आणि लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
Ajit Pawar, Dy. C.M.
Ajit Pawar, Dy. C.M.Sarkarnama
Published on
Updated on

नाशिक : जनतेमुळे नेते असतात. सत्ता येते आणि जाते. त्यामुळे नम्रता असली पाहिजे. आजकालचे पुढारी लोकांना नमस्कार देखील करीत नाहीत. नमस्कार केल्याने त्यांच्या बापाचे काय जाते? हेच कळत नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar, Dy. C.M.
चंद्रकांत दादांवर केंद्रीय नेतृत्व नाराज हे मी पहिल्यांदाच ऐकतोय!

कळवण येथे झालेल्या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, "तुम्ही आमची भावकी निवडून दिली आहे. त्यामुळे तिजोरी माझ्याकडे आहे. आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar) यांना काहीही कमी पडू देणार नाही", अशी ग्वाही अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाशिककरांना दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत आज येथील कळवण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकांमाचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. यानिमित्त आदिवासी मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Jhirwal), स्थानिक आमदार नितीन पवार यावेळी उपस्थित होते.

Ajit Pawar, Dy. C.M.
उमेदवार दिलदार असल्याने निवडणूक बिनविरोध होऊनही मतदारांत खुषी!

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्यातील सध्याच्या विविध घडामोडींवर भाष्य केलं. नाशिककरांना विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. "तुम्ही आमची भावकी निवडून दिली आहे. त्यामुळे तिजोरी माझ्याकडे आहे. आमदार नितीन पवार यांना काहीही कमी पडू देणार नाही", अशी ग्वाही अजित पवार यांनी नाशिककरांना दिली.

ते पुढे म्हणाले, "आमच्या विनंतीचा मान ठेवून आपण आमदार नितीन पवार यांना निवडून दिले आहे. त्यामुळे मी निधी कमी पडू देणार नाही. कोरोनामुळे परिस्थिती बदलली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे उद्घाटन होत आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन व्हायला आज दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. आपल्या आघाडीला आपला पाठिंबा राहिला पाहिजे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांनी पुढे जायचं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुढे जायचं आहे, असे सांगून श्री. पवार पुढे म्हणाले, सप्तशृंगीच्या साक्षीने आपल्या समोर नतमस्तक होतो. या भागाचे नेते, आजकालचे पुढारी नमस्कार करत नाहीत. त्यांच्या बापाचं काय जातं ते समजत नाही. मी कायम सांगतो सत्ता येते जाते मात्र नम्रता असावी", असा टोला अजित पवारांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com