Jalgaon : जळगाव शहरात गावठी कट्टयांतून गोळीबार करण्याचे प्रकार सर्रास वाढले आहेत. पोलीसांनी आतापर्यंत जिल्ह्यातून तब्बल ५० गावठी कट्टे जप्त केले आहेत. परंतू, जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील उमर्टी येथे असलेल्या गावठी कट्टा कारखान्यावर मात्र बंद करण्याची कारवाई कधीच करण्यात आली नाही. पोलिसांची ही अकार्यक्षमता असून पोलीस तत्परता दाखवतील काय असा प्रश्न राज्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.
जळगाव(Jalgaon) येथे कानळदा रोडवर एका टोळक्याने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत राज्याचे मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत पॉईंट ऑफ इर्न्फेमेशनव्दारे प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, जळगाव येथे काल गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. दोन दिवसांपूर्वीही जिल्ह्यात अशीच घटना घडली होती. पोलिसांनीही आतापर्यंत ५० गावठी कट्टे जप्त केले आहेत. आणखीही काही कट्टे असू शकतात.
चोपडा तालुक्यातील उमर्टी येथे या गावठी कट्टयांचा कारखाना आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाईसुध्दा केली आहे. परंतू पोलिसांचे व त्यांचे चांगले संबंध असल्याने ते पुन्हा सुरू झाले आहेत. मात्र, आता हे कट्टे संपूर्ण महाराष्ट्र(Maharashtra)भर होत आहेत, ही गंभीरबाबत असून पोलिसांनी लक्ष देवून त्यावर कारवाई करून हा कारखाना बंद करण्याची गरज आहे. पोलीस ही कार्यक्षमता दाखवतील काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
गावठी कट्टा काय असते?
विधीमंडळात एकनाथ खडसे प्रश्न उपस्थित करत असताना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गावठी कट्टा पिस्तुल काय असते ? असा प्रश्न केला त्यावेळी माहिती देतांना खडसे म्हणले, होय,ते पिस्तुल असते परंतू, गावठी पध्दतीने सायकलचे स्पेअर पार्ट वापरून वगेरे तयार केलेले असते. जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील उमर्टी येथे ते तयार होत असतात. त्याचा आता गुन्हेगार सर्रास वापर करत आहेत असंही त्यांनी सांगितले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.