सरकार तुमचं आहे, गुन्हा दाखल करून चौकशी करा!

एकनाथ खडसे यांनी पोलिसांकडून पाच वर्षांची चौकशी कुणाच्या दबावाने असा प्रश्न केला.
Eknath Khadse
Eknath Khadse Sarkarnama
Published on
Updated on

जळगाव : आपण चाळीस वर्षे राजकीय क्षेत्रात आहोत, (Eknath Khadse said, I am politics since 40 years) सहकार क्षेत्रातही आहोत, आपला सर्व व्यवहार उघड आहे, कोठेही आपण व परिवाराने गैरव्यवहार केलेला नाही. त्यामुळेच आपण जिल्हा दूध संघातील (District Milk Federation) लोणी व दूध भूकटी प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी करीत आहोत. मात्र कुणाच्या तरी दबावाने पोलिस तक्रार दाखल करून घेण्यास तयार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी दिले. (NCP leader Eknath Khadse criticise BJP MLA Mangesh Chavan)

Eknath Khadse
जनता त्रस्त, पालकमंत्री गिरीश महाजन मात्र राजकारणात दंग!

या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल लवकरच येईल. आमदार मंगेश चव्हाण यांचे सरकार आहे, त्यांनी सहकार विभागाच्या माध्यमातून चौकशी करावी, असे आव्हान खडसे यांनी दिले.

Eknath Khadse
मांजरपाडा हा छगन भुजबळ यांचा माईलस्टोन प्रकल्प!

जळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार एकनाथ खडसे म्हणाले, की दूध संघातील लोणी व दूध भुकटी प्रकरणी चोरीची तक्रार असताना त्या संबधी गुन्हा दाखल करून चौकशीची गरज आहे. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न करता पाच वर्षाची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी पाच वर्षाचा अहवाल मागितला आहे.

वास्तविक चौकशीचा अधिकार सहकार विभागाला आहे. सहकार कायद्यानुसार चौकशीस आमचा आक्षेप नाही. त्यामुळे दबावाखाली ही चौकशी केली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

न्यायालयात याचिका दाखल

जिल्हा दूध संघातील लोणी व दूध भुकटी प्रकरणी अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसानी तो नोंदलेला नाही. त्यामुळे आता न्यायालयात त्याबाबत याचिका दाखल करण्यात आली, असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. त्याचा निकालही लवकरच येईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

चव्हाणांवर अब्रूनुकसानीचा दावा

आमदार मंगेश चव्हाण यांच्या आरोपावर बोलताना खडसे म्हणाले, की आमदार चव्हाण यांचा जिल्हा दूध संघाशी काय संबध? ते सभासदही नाहीत, त्यांच्याकडे माहिती कशी आली? त्यांनी ती चोरली काय, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. खडसे परिवारावर ते आरोप करीत आहेत. या प्रकरणी आपण त्यांच्यावर अब्रू नुकसानाचा दावा दाखल करणार आहोत.

केवळ तक्रार करणे हाच त्यांचा उद्योग आहे, त्यांनी मागे आरटीओवर आरोप केले, त्याचे काय झाले? त्यांचे सरकार असूनही त्याची चौकशी झाली नाही. दूध संघाचा ताबा घेण्यासाठीही ते रात्री चोरासारखे आले. आम्हाला रात्रीच्या अंधारात त्यांच्यासारखे काहीही करण्याची गरज नाही आणि त्यांनी खुले आव्हान देण्यापेक्षा तेही आमदार आहेत, मीही आमदार आहे. त्यांनी हा प्रश्‍न विधानसभेत मांडावा मीही विधान परिषदेत मांडेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com