NCP Sharad Pawar Politics: बोदवडला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला दुहेरी शॉक...७ नगरसेवकांनी पक्ष सोडला!

Eknath Khadse; Corporators are attracted to power, seven corporators of NCP Sharad Pawar joins Shivsena-बोदवड नगरपालिकेच्या सात माजी नगरसेवकांनी शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजप पक्षात प्रवेश केला
Chandrakant Patil & Eknath Khadse
Chandrakant Patil & Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

NCP Sharad Pawar news: आता नगरपालिका स्तरावरीही विरोधकांना सत्तेचा मोह सतावू लागला आहे. बोदवड (जळगाव) येथे सात माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला.

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार मोठ्या बहुमताने सत्तेवर आले आहे. त्यामुळे सत्तेच्या सावलीचा लाभ सत्ताधारी नेत्यांपासून तर नगरसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत सगळ्यांनाच मिळतो आहे. त्यामुळेच आता विरोधकांनाही महायुतीचे आकर्षण वाटू लागले आहे.

Chandrakant Patil & Eknath Khadse
Malegaon vote Jihad: धक्कादायक, व्होट जिहादसाठी हिंदू लोकांनी पैसे खर्च केले का?

बोदवड (जळगाव) नगरपालिका माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथे पक्षाच्या सात माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि श्री. खडसे दोघांनाही धक्का आहे.

Chandrakant Patil & Eknath Khadse
Manikrao Kokate : काँग्रेसच्या 'ऑफर'चा धुरळा बसत नाही, तोच मंत्री कोकाटेंनी फोडला बाॅम्ब; म्हणाले, 'अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत'

स्थानिक राजकारणात माजी मंत्री एकनाथ खडसे गटाला हा धक्का मानला जातो. शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि खडसे यांच्यातील राजकीय वाद दिवसागणिक वाढतच आहे. यानिमित्ताने आमदार पाटील यांनी पुन्हा एकदा खडसे गटावर मात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक हकीम बागवान, मुजम्मिल शाहा, एकताबी लतीफ शेख आणि त्यांचे पती यांनी शिवसेना शिंदे पक्ष प्रवेश केला. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष आनंद पाटील, उपनगराध्यक्ष संजय गायकवाड यांसह विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. यावेळी विविध पदाधिकारी उपस्थित होते.

माजी नगरसेवक कडू सिंग उर्फ भरत पाटील, योगिता खेवलकर, पूजा पारधी, डॉ. सुधीर पाटील या नगरसेवकांसह काँग्रेसच्या तालुका महिला आघाडी प्रमुख उषा पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. जामनेर येथे हा प्रवेश झाला. भाजपचे शहराध्यक्ष मधुकर राजे यांचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वैमनस्याचा फटका या नगरसेवकांना बसला होता. परिसरातील विकास कामांसाठी निधीच्या अपेक्षेने हा प्रवेश झाल्याचे बोलले जाते. एकंदरच गाव पातळीवर देखील विरोधी पक्षात थांबण्याची तयारी नगरसेवकांची राहिलेली नाही, असा संदेश या निमित्ताने गेला आहे

-----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com