एकनाथ खडसेंच्या विजयाने तापी खोऱ्यात ‘दिवाळी’

मुक्ताईनगरला ‘राष्ट्रवादी पुन्हा’ गाण्यावर ठेका धरत कार्यकर्त्यांचा जल्लोष
Rohini Khadse News, Eknath Khadse News, Jalgaon News
Rohini Khadse News, Eknath Khadse News, Jalgaon NewsSarkarnama
Published on
Updated on

मुक्ताईनगर : विधान परिषदेच्या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) पहिल्याच फेरीत विजयी झाले. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी हा विजय मोठ्या प्रमाणात सेलीब्रेट केला. निकालाआधीच जळगावला (Jalgaon) तापी पट्ट्यात राष्ट्रवादी कॉंग्रेससह समर्थकांकडून अक्षरश: दिवाळी साजरी करण्यात आली. मुक्ताईनगर येथे कार्यकर्त्यांकडून डीजे लावत गाण्यांवर ठेका धरत जल्लोष करण्यात आला. (NCP workers greet people forEknath Khadse`s victory)

Rohini Khadse News, Eknath Khadse News, Jalgaon News
आमदार कुणाल पाटील यांचा भाजपला `जोर का झटका`

काल झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील दोघांना संधी मिळाली. शिवसेनेने नंदुरबारचे पाडवी यांनी संधी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांनी उमेदवारी दिली होती. त्यामुळे या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्र चर्चेत राहिला. (Eknath Khadse latest Marathi News)

Rohini Khadse News, Eknath Khadse News, Jalgaon News
पोपटाचा गळा आता दाबायला पाहिजे...

विशेषतः खडसे यांची उमेदवारी खानदेशसाठी अतिशय महत्त्वाची होती. त्यांचे समर्थक आणि विरोधक दोघांनीही त्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावली होती. भाजपने श्री खडसे यांच्या पराभवासाठी पडद्यामागे व उघडपणे प्रयत्न केले. त्यामुळे प्रारंभी खडसे समर्थक काळजीत होते. मात्र काल निकाल लागल्यावर त्यांनी आनंद साजरा केला. सहा वर्षानंतर खडसे यांच्या समर्थकांनी गुलाल उधळला.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र माळी, पांडुरंग नाफडे, जितू पाटील, विलास धायडे, दशरथ कांडेलकर, शिवराज पाटील, असिफ बागवान, बापू ससाणे, संदीप जमले, मनोज जाधव, हर्षल झोपे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बोदवडला आतषबाजी

शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेते एकनाथ खडसे यांच्या विजयापूर्वीच जल्लोष करून आतषबाजी केली. ‘डीजे’च्या तालावर नाचत मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. यानंतर विजयाची बातमी येताच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुन्हा आतषबाजी करून घोषणा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कैलास चौधरी, मधुकर राणे, नगरसेवक दीपक झांबड, भरत पाटील, हाकिम बागवान, लतीफ शेख, गोपाल गंगातिरे, कल्पेश शर्मा, सलाम शेख, ईज्जू शेख, मुज्जफर मिया यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com