
Eknath khadse news: माजी मंत्री एकनाथ खडसे सध्या राजकीय द्विधा अवस्थेत आहेत. भाजप त्यांना प्रवेश देईना आणि राष्ट्रवादीमध्ये त्यांचे मन रमेना, अशी स्थिती आहे. जळगावच्या राजकारणात सध्या हा चर्चेचा विषय आहे. भाजप पक्षात परतण्याची घोषणा करून आता ते स्वतःच सापळ्यात अडकले आहेत.
लोकसभा निवडणुकीत शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला उमेदवारीसाठी एकनाथ खडसे यांनी झुलवत ठेवले. शेवटच्या क्षणी त्यांनी आपली सून रक्षा खडसे हिच्या भाजपच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार देखील केला.
लोकसभा निवडणुकीदरम्यान श्री खडसे यांनी भाजपमध्ये परतणार असल्याचे स्पष्ट केले होते. या संदर्भात त्यांनी केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केली होती. दिल्लीतील भाजपने त्यांनी त्यांच्या प्रवेशाला होकार दिला अशी वातावरण निर्मिती देखील खडसे यांनी केली.
मात्र गेल्या सहा महिन्यात विशेष प्रयत्न करू नये एकनाथ खडसे यांना भाजपने स्वीकारलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जळगावचे सर्वेसर्वा गिरीश महाजन यांचा खडसे यांच्या घर वापसीला विरोध आहे. महाजन यांच्या विरोधामुळे जळगावच्या स्थानिक नेत्यांनीही खडसे यांची कोंडी केली.
स्थानिक पातळीवर पक्षाच्या नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी खडसे यांना भाजपच परतण्यास विरोध केला आहे. या विरोधामुळे केंद्रीय नेतृत्व आस्ते कदम झाले आहे. काही दिवसात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही खडसे यांच्या घर वापसीवर बोलणे टाळले आहे. दुसरीकडे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सातत्याने खडसे यांना टार्गेट करीत असतात.
एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय कलगीतुरा सर्वश्रुत आहे. खडसे यांच्या मागे विविध खटल्यांचा ससेमीरा लावण्यात कोणाचा हात होता हे देखील लपून राहिलेले नाही. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी म्हणून मंत्री महाजन हे खडसे यांच्या प्रवेशाच्या विरोधात उभे आहेत.
भारतीय जनता पक्षातील सध्याची राजकीय स्थिती आणि भक्कम संघटनात्मक रचना याचा विचार करता त्यांना अन्य नेत्यांची आवश्यकता उरलेली नाही. उपस्थितीत जलसंपदा मंत्री महाजन यांना दुखावून आणि जळगावच्या स्थानिक विरोधाला बाजूला सारून खडसे यांना प्रवेश देणे भाजपने टाळल्याचे चित्र आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सध्या खडसे यांची प्रखडलेली घरवापसी चर्चेचा विषय ठरला आहे.
-------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.