Eknath Khadse News : स्वगृही परतण्यासाठी नाथाभाऊंना भाजपने घातल्या अटी; आमदारकी अन्...

Rohini khadse News : एकनाथ खडसेंची घरवापसी बट कंडिशन अप्लाय, कोणत्या अटी भाजपने घातल्या...
Sarkarnama
SarkarnamaEknath Khadse News

Jalgaon News : भारतीय जनता पक्षाचे पुर्वाश्रमीचे नेते एकनाथ खडसे उर्फ नाथाभाऊंनी 2020 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधानपरिषदेवरील आमदारही झाले. आता मात्र नाथाभाऊंचा पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी होणार आहे, असे खडसे यांनी सांगितले. मात्र त्यांची कन्या अॅड. रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा असून त्यांनी पवारांचा पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले आहे. नाथाभाऊंच्या कन्येच्या या भूमिकेनंतर भाजने आता घरवापसी करण्यासाठी काही अटी ठेवले असल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

Sarkarnama
BJP Politics: कोल्हेंची नाराजी कधी दूर होणार? विखेंसोबत एकाच मंचावर येण्याचं टाळलं!

एकनाथ खडसे हे जरी भाजपात प्रवेश करणार असले तरी त्यांची कन्या ॲड. रोहिणी खडसे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षातच राहणार आहोत, असे ठरवले आहे. पवारांच्या पक्षातच थांबून आपण संघर्ष करणार आहोत, असा ठाम निर्धार ॲड. रोहिणी खडसे यांनी ‘सरकारनामा’शी संवाद साधताने म्हटले आहे. यामुळे आता भाजपसमोर अडचण निर्माण झाली आहे. खडसेंच्या कन्येच्या या भूमिकेमुळे भाजपने घरवापसी करण्यासाठी त्यांच्यापुढे अटी ठेवल्या आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदारकीचा राजीनामा -

एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेच्या प्रवेशानंतर ज्येष्ठ नेते शरद यांनी विधानपरिषदेचे आमदारकी बहाल केली होती. यामुळे आता ते आमदार असेपर्यंत अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य आहेत. त्यामुळे भाजपात प्रवेश करायचा असेल आणि घरवापसी करायची असेल तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल.

Sarkarnama
Sanjay Kokate Join NCP : 'संजय कोकाटे, राष्ट्रवादी बळकट करा; माढ्यातून तुमचा सूर्य तुतारीच्या नावाने उगवेल'

कन्येला पक्षात आणावे लागेल -

एकनाथ खडसे (Eknat Shinde) यांची कन्या अॅड. रोहिणी खडसे यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा द्यायला सांगून भाजपात आणावे, असेही वरिष्ठांकडून त्यांना सांगण्यात आल्याचे कळते. मात्र रोहिणी खडसे यांनी आपले वडीस जरी भाजपात जाणार असले तरी मी मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षातच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

Sarkarnama
Sanjay Kokate Join NCP : 'संजय कोकाटे, राष्ट्रवादी बळकट करा; माढ्यातून तुमचा सूर्य तुतारीच्या नावाने उगवेल'

शरद पवारांचा ऋणी - नाथाभाऊंची भावना

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) पक्षप्रमुख शरद पवार यांचा मी कायम ऋणी आहे. संकटात त्यांनी मला नेहमीच मदत केली आहे. आज मी सगळ्याच प्रश्नांची उत्तरे देणार नाही. मी माझ्या स्वगृही जात आहे, त्याचा आनंद आहे. मी भाजपात यावं यासाठी नेतेच आग्रही होते. राजधानी दिल्लीत जाऊन मी भाजप प्रवेश करणार आहे, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com