Eknath Khadse On Sharad Pawar : मी शरद पवारांचा कायम ऋणी; स्वगृही परतणारे नाथाभाऊ भावूक...

Eknath Shinde On Sharad Pawar : माझ्या राजकीय संकट काळात शरद पवारांनी मला मदतीचा हात दिला.
Eknath Khadse On Sharad Pawar
Eknath Khadse On Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : भारतीय जनता पक्षाचे पुर्वाश्रमीचे नेते एकनाथ खडसे उर्फ नाथाभाऊंनी 2020 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधानपरिषदेवरील आमदारही झाले. आता मात्र नाथाभाऊंचा पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी होणार आहे, याला खुद्द खडसे यांनीच दुजोरा दिला आहे. यामुळे नाथाभाऊ पुन्हा आपल्या घरी जाणार आहेत. (Jalgaon Politics)

शरद पवारांचा ऋणी -

साम टिव्ही या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे आभार मानले आहे. खडसे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) पक्षप्रमुख शरद पवार यांचा मी कायम ऋणी आहे. माझ्या राजकीय संकट काळात त्यांनी मला मदतीचा हात दिला. त्यांचा मी नेहमीच ऋणी राहीन.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिल्लीत पक्षप्रवेश -

एकनाथ खडसे (Eknath Khadse) आपल्या भाजप प्रवेशावर म्हणाले, आज मी सगळ्याच प्रश्नांची उत्तरे देणार नाही. घर मी बांधलं आहे. मी माझ्या भाजपच्या घरी जात आहे. माझ्या स्वगृही जात आहे, त्याचा आनंद आहे. मी भाजपात यावं यासाठी नेतेच आग्रही होते. राजधानी दिल्लीत जाऊन मी भाजप प्रवेश करणार आहे, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली.

कन्या रोहिणी खडसेंची शरद पवारांना साथ -

ॲड. रोहिणी खडसे या सुद्धा वडिलांसोबत भाजपप्रवेश करणार काय? असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. परंतु काल सायंकाळी रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी ट्वीट केले आहे. त्या म्हणाल्या, "आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करीत आहोत, मी याच पक्षात आहे. भविष्यातही याच पक्षात राहणार आहे. यात त्यांनी तुतारी फुंकत असलेला आपला फोटोही जोडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com