Jalgaon Politics: खडसे आणि गुलाबराव पाटलांमध्ये समझोता; अब्रू नुकसानीचा दावा मागे

Gulabrao Patil Vs Eknath Khadse: पाच कोटींच्या अब्रू नुकसानीचा हा दावा मागे घेण्यात आल्यामुळे पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Eknath Khadse, Gulabrao Patil News
Eknath Khadse, Gulabrao Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Eknath Khadse News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी ठाकरे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात पाच कोटींचा अब्रू नुकसानीचा दाखल केलेला होता. मात्र हा दावा खडसे यांनी मागे घेतला आहे. गैरसमजतीतून हा प्रकार झाला होता, त्यानंतर दोघांमध्ये आपसात तडजोड झाल्यानंतर दोघांकडून लेखी घेण्यात येऊन हा खटला मागे घेण्यात आला आहे.

पाच कोटींच्या अब्रू नुकसानीचा हा दावा मागे घेण्यात आल्यामुळे पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2016 मध्ये खडसे हे मंत्री असताना त्यांच्या विरोधात पाटील यांनी एका भाषणात घोटाळा केल्याचा आरोप केला होता. याबाबत खडसे यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात पाटील यांच्या विरुद्ध पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता.

Eknath Khadse, Gulabrao Patil News
Sujay Vikhe Patil Statement: पंकजा मुंडे यांचा DNA भाजप'चा; पक्ष सोडणार नाहीत; खासदार सुजय विखेंना विश्वास!

या दाव्यात तारखेवर एकदा गुलाबराव पाटील गैरहजर राहिले तर दुसऱ्या तारखेवर खडसे व पाटील हे दोघेही गैरहजर झाले होते. न्यायालयाने दोघांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड केला होता. या प्रमुख नुकसानीच्या खटल्यात न्यायालयात तारीख होती. या तारखेवर पाटील तसेच एकनाथ खडसे हे दोन्हीही नेते हजर होते.

न्यायालयात अब्रू नुकसानीच्या दाव्यासंदर्भात सुनावणी पार पडली. यात खडसे व पाटील या दोघांचे लेखी नोंदवून घेण्यात येऊन दोघांमध्ये तडजोड झाल्याने हा खटला मागे घेण्यात आला. या खटल्यासंदर्भात दोघांमध्ये समजूत झाली. गैरसमजतेतून हा दावा दाखल झाला होता. याबाबत दोघांनी न्यायालयात लेखी निवेदन दिले. त्यानुसार आता हा दावा मागे घेण्यात आला, असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

Eknath Khadse, Gulabrao Patil News
Divisional commissioner News : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी घेतली स्वेच्छा निवृत्ती ..

गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावरील दावा हा मागे घेण्याची विनंती न्यायालयाला केली. ती न्यायालयाने मान्य केली. आपसात बसून हा दावा निकाली काढण्यात आला. पाटील यांनी घ्यायला येण्याचे आवाहनावर बोलताना खडसे म्हणाले की, त्यांच्यासोबत चहा घ्यायला हरकत नाही. आमची दुश्मनी नाही, असे खडसे म्हणाले. यानंतर अशा प्रकारचे आरोप करताना त्यांनी पुराव्यानिशी करावेत, असे खडसे यावेळी म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com