Ekanath Khadse News : लोकसभा निवडणुका जवळ आल्या असल्याने सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप केले जात आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करीत असून, त्यासाठी ते दिल्लीमधील नेत्यांच्या गाठीभेटी घेत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळेच खडसे दिल्लीतील भाजपच्या नेत्याच्या गाठीभेटी घेत असल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपामुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. हे सत्ताधारी मंडळींकडून केले जात असलेले आरोप निराधार असल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे भाजपमध्ये येण्यासाठी दिल्लीमध्ये जाऊन भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी भाजपमध्ये येण्यासाठी भाजप त्यांच्या घरी बोलवायला गेली नव्हती. मात्र, त्यांच्याकडून भाजपमध्ये येण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप भाजप प्रवक्ते अजित चव्हाण (Ajit Chavhan) यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत केला आहे. (Eknath Khadse News)
येत्या काळात एकनाथ खडसे भाजपमध्ये येण्यास तयार असले तरी त्यांना पक्षात घ्यावे किंवा न घ्यावे हा भाजपच्या पक्षश्रेष्ठींचा निर्णय असणार आहे. जो निर्णय घेतला जाईल तो कार्यकर्त्यांना मान्य असेल, एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नसल्याचेही अजित चव्हाण यांनी बोलताना स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतत असल्याच्या चर्चांनी वेग घेतला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता एकनाथ खडसे यांनीच भाजपमधील प्रवेशातील चर्चांना पूर्णविराम देताना या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एकनाथ खडसे यांनी दिल्लीमध्ये वैयक्तिक कामासाठी गेलो असल्याचे स्पष्ट करीत येत्या काळात आपण भाजपमध्ये जात असल्याच्या चर्चेमध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. काही कामांसाठी मी दिल्लीला गेलो होतो, माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. ज्यावेळी असा निर्णय घ्यायचा त्यावेळी आपण स्वतःहून माध्यमांना माहिती देईन, असेही त्यांनी या वेळी सांगितले. मात्र, अशा कोणत्याही हालचाली नसल्याचे खडसे यांनी संगितले.
R