NCP News: एकनाथ शिंदे गटाच्या मदतीने राष्ट्रवादीचे भोसले ठरले किंगमेकर!

नाशिक जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद भाबड यांची निवड झाल्याने समर्थकांचा जल्लोष.
Labour Fedration`s newly elected office bearers
Labour Fedration`s newly elected office bearersSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : जिल्हा मजूर फेडरेशऩच्या (Nashik Labour fedration) बिनविरोध निवडणूक प्रक्रीया यंदा खंडीत झाली. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी प्रमोद भाबड (Pramod Bhabad) तर, उपाध्यक्षपदी शर्मिला कुशारे (Sharmila Kushare) १२ विरुद्ध ८ मतांनी विजयी झाले. यामध्ये काँग्रेसचे (Congress) संपत सकाळे (Sampat Sakale) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांच्या गटात राजकीय सामना रंगला. त्यात एकनाथ शिंदे गटाचे (Eknath Shinde) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी भोसले गटाला साथ देत लाभ करून घेतला. (Eknath Shinde group supports NCP in Labour fedration election)

Labour Fedration`s newly elected office bearers
OBC Census In Maharashtra: स्वतंत्र गणनेसाठी समता परिषद झाली आक्रमक!

संस्थेच्या इतिहासात प्रथमच मतदान प्रक्रीया पार पडली आहे. जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या (फेडरेशन) अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची होणारी बिनविरोध निवडणुकीस यंदा खंड पडला. पदाधिकाऱ्यांच्या विजयाची घोषणा झाल्यावर नवनिर्वाचीत अध्यक्ष भाबड व उपाध्यक्ष कुशारे समर्थकांनी जल्लोष केला.

Labour Fedration`s newly elected office bearers
Nashik; भाजपमध्ये मोठा गोंधळ, पदवीधरचा उमेदवारच ठरेना!

जिल्हा मजूर संस्थांच्या संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी नवनिर्वाचीत संचालक मंडळाची बैठक मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश गिरी महंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. निवडणुकीनंतर तयार झालेले संचालक संपतराव सकाळे आणि राजेंद्र भोसले गटाने बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न केला. मात्र, बिनविरोध निवडणूक होऊ शकली नाही.

अध्यक्षपदासाठी भोसले गटाकडून भाबड तर सकाळे गटाकडून ज्ञानेश्वर लहाने यांनी अर्ज दाखल केला होता. उपाध्यक्षपदासाठी भोसले गटाकडून शर्मिला कुशारे तर सकाळे यांच्या गटाकडून सुरेश भोये यांनी अर्ज दाखल केला. अर्ज दाखलनंतर निवडणूक अधिकारी महंत यांनी अर्ज माघारीसाठी अवधी दिला. मात्र, माघार न झाल्याने मतदान प्रक्रीया झाली. यात अध्यक्षपदासाठी भाबड यांना १२ तर, प्रतिस्पर्धी लहाने यांना ८ मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी कुशारे यांना १२ तर, प्रतिस्पर्धी भोये यांना ८ मते मिळाली.

त्यानंतर, महंत यांनी अध्यक्षपदी भाबड तर, उपाध्यक्षपदी कुशारे विजयी झाले असल्याचे जाहीर केले. बैठकीस संचालक संपतराव सकाळे, राजेंद्र भोसले, अमोल थोरे, सविता धनवटे, शिवाजी रौंदळ, भारत कोकाटे, प्रमोद मुळाणे, शिवाजी कासव, सतीश सोमवंशी, रोहित पगार, राजेंद्र गावित, शशिकांत उबाळे, दीप्ती पाटील, कविता शिंदे, अर्जुन चुंभळे, राजाभाऊ खेमनार उपस्थित होते.

प्रथमच मतदान प्रक्रीया

संस्थेच्या इतिहासात आजवर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रीया पार पडलेली नाही. सन १९८८-८९ या आर्थिक वर्षात उपाध्यक्ष निवडीप्रसंगी मतदानाचा पेचप्रसंग उभा राहिला होता. त्यावेळी हात उंचावून मतदान प्रक्रीया राबविण्यात आली होती. मात्र, त्यानंतर अद्यापपर्यंत पदाधिकारी मतदान झालेले नव्हते. मात्र, यंदा सकाळे व भोसले यांच्या गटात चुरस झाल्याने मतदान घेण्याची नामुष्की ओढविली.

समर्थकांकडून जल्लोष

अध्यक्षपदासाठी भाबड व उपाध्यक्षपदासाठी कुशारे यांची निवड जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून कार्यालयाबाहेर जल्लोष साजर करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचीत पदाधिकारी यांच्या स्वागतासाठी सर्मथकांनी मोठी गर्दी केली होती.

भोसलेकडून आमदार कांदे यांचे कौतुक

निवड प्रक्रीया झाल्यानंतर झालेल्या भाषणात राजेंद्र भोसले यांनी आमदार सुहास कांदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. नेता कसा असावा असे सांगत, सक्षम नेता आणि निष्ठावान कार्यकर्ता यांचा नवा आयाम या निवडणुकीमुळे बघायला मिळाला; याठिकाणी आमदार कांदे यांचा उल्लेख करत कार्यकर्त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत कार्यकर्त्याला उभारी देण्याचे काम या नेत्याने केले आहे. संचालक पदाच्या निवडणुकीत भाबड हे तालुक्यातून बिनविरोध निवडून आले होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत निर्णायक क्षणी आपली सगळी ताकद कांदे यांनी भाबड यांच्या पाठीशी उभी केली अशा शब्दांत भोसले यांनी कौतुक केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com