Eknath Shinde News : शिवसेनेसाठी 'काळा दिवस'; ठाकरेंचा एक आमदार फुटताना शिंदे का झाले दुखी ?

Eknath Shinde On Uddhav Thackeray : ज्या शिवतीर्थावरुन बाळासाहेबांनी हिंदुत्वावर भाषणे दिली...
Eknath Shinde News :
Eknath Shinde News :Sarkarnama
Published on
Updated on

Nandurbar News : ठाकरे गटाचे प्रमुख्य उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी आजचा दिवस हा 'काळा दिवस' असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे गटाचे नंदुरबारचे विधान परिषद आमदार आमशा पाडवी यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. (Latest Marathi News)

"ज्या शिवतीर्थावरून स्वर्गीय बाळासाहेबानी संपूर्ण हिंदुस्थानाला मार्गदर्शन केलं, त्यांच्या वारसदाराला त्याच शिवतीर्थावर ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, त्या राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून बसायची वेळ आलेली आहे. खरं तर राहुल गांधी यांनी सर्वप्रथम सावरकर स्मारकात जाऊन त्याना अभिवादन करायला हवे, कारण सावरकर ही देशाची अस्मिता आहे," असं शिदे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde News :
Pune NCP Ajit Pawar : लोकसभेच्या तोंडावर अजित पवार गटाची नाराजी दूर; शिंदे सरकारनं उचललं मोठं पाऊल

"सावरकर यांच्यावर वाट्टेल ते आरोप करणं, त्याना शिव्या शाप देणे हे कोणतं हिंदुत्व आहे? आणि सावरकरांचा होत असलेला अपमान निमूटपणे सहन करणे हे शिवसैनिकांचे दुर्दैव आहे. उद्धव ठाकरे हे, टगर्व से कहो हम हिंदू है' आता कोणत्या तोंडाने म्हणणार असा सवाल शिंदे यांनी विचारला? त्यामुळे आजचा दिवस हा शिवसेना आणि शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे," असे मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

"ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) कायम दूर ठेवले त्यांच्यासोबत ठाकरे मांडीला मांडी लावून बसले. बाळासाहेब म्हणाले होते की, काँग्रेससोबत बसायची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेन. आज त्यांचे पुत्र सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्याजवळ जाऊन बसले आहेत. जे आपल्या देशाची बदनामी परदेशात जाऊन करतात, पंतप्रधानांची बदनामी विदेशात जाऊन करतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे हे दुर्दैव आहे, असे शिंदे म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com