Eknath Shinde News: उत्तर महाराष्ट्रातील 'या' जागेसाठी मुख्यमंत्र्यांची धावपळ

Nashik Lok Sabha Election 2024: मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्योजकांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी उद्योजकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी स्वतः पुढाकार घेण्याचे त्यांनी सांगितले.
Nashik Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election 2024Sarkarnama

Nashik News: नाशिक मतदार संघात महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे (Hemant Godse) उमेदवार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची या जागेसाठी विशेष धावपळ सुरू आहे,

नाशिक मतदार संघात (Nashik Lok Sabha Election 2024) शिवसेना शिंदे गटाच्या प्रचारात अद्याप सुसूत्रता आली नसल्याच्या तक्रारी आहेत. सहकारी पक्षांना प्रचारात सामील करून घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. यातच उद्योजकांपासून तर शेतकरी आणि नागरिकांना आपलेसे करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक लाभदायी योजनांचे आमिष मतदारांना दाखविले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शहरात महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. त्यांना प्रचारात सक्रिय होण्यासाठी सूचना केल्या. त्यानंतर पदाधिकाऱ्यांकडून निवडणूक प्रचारातील अडचणींची माहिती घेत मार्गदर्शन केले. त्यामुळे आता गोडसेंच्या प्रचाराला गती येण्याची चिन्हे आहेत.

Nashik Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Voting LIVE: पैसे रस्त्यावर पडले, हेलिकॉप्टरमधून 'जड' बॅगा उतरवल्या! राऊत,पवार सत्ताधाऱ्यांवर संतापले!

मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्योजकांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी उद्योजकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी स्वतः पुढाकार घेण्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांवरून पाच लाख वाढविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

१०० टक्के व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळेल, या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे उद्योजकांसाठी आचारसंहितासमताच त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी निर्णय घेतले जातील याची घोषणाही त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दावोस येथील उद्योजकांच्या मेळाव्यातून पहिल्या टप्प्यात एक लाख 37 हजार कोटींचा आणि दुसऱ्या टप्प्यात तीन लाख 73 हजार कोटींचे करार झाला आहे. उद्योजकांना सुरक्षित वाटू लागल्याने हे शक्य झाले.

त्यांचा लाभ उद्योग क्षेत्राला होणार आहे. सध्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून दरवर्षी सहा हजार रुपये अनुदान मिळते. त्यात राज्य सरकारकडून तेवढीच भर टाकण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणाही त्यांनी केली.

यावेळी क्रेडाई संघटनेचे अध्यक्ष पाटील, सुनील गवांदे, रत्नाकर वाणी, सुनील चोपडा, जितूभाई ठक्कर, राजेंद्र निकम, राजेंद्र फड, प्रफुल्ल संचेती, सतीश शुक्ल, समीर रकटे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com