Eknath Shinde Shiv Sena : महायुतीत फूट, शिंदेंचे शिलेदारांना घ्यायचाय वचपा; शिवसेनेचा स्वबळाचा नारा

Eknath Shinde Shiv Sena to Contest Rahuri Election Independently : माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत राहुरी इथं इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
Eknath Shinde Shiv Sena
Eknath Shinde Shiv SenaSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena independent contest : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतले जात आहेत. स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या निर्णयानुसार वरिष्ठ नेते निर्णय घेत आहेत. अहिल्यानगरमधील राहुरीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.

माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत राहुरी नगरपरिषदेवर कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे महायुतीला झटका बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे तनपुरे सहकारी कारखाना निवडणुकीत पराभवाचा वचपा घेण्याची तयारी असल्याचे म्हटले जात आहे.

माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत राहुरी नगरपरिषद निवडणुकासाठी इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात स्वबळाचा नारा देण्यात आला. नगर दक्षिण प्रमुख बाबूशेठ टायरवाले, शेतकरी (Farmer) विकास मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे, शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे, युवा सेना जिल्हाप्रमुख शुभम वाघ उपस्थित होते.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशानुसार स्थानिकची निवडणूक लढवली जाईल. नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या सर्वसामान्य कुटुंबातील युवा उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. राहुरी नगरपरिषदेवर शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे राजूभाऊ शेटे यांनी म्हटले.

Eknath Shinde Shiv Sena
Shirdi BJP vs RSS : मंत्री विखेंविरोधात 'RSS'च्या जुना भिडूनं ठोकला शड्डू? शिर्डीत बरीचं काही उलथापालथ होणार

दरम्यान, या बैठकीत शिवसैनिकांनी स्वबळाचा नारा दिला. राहुरीतील तनपुरे सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राजू शेटे यांच्या नेतृत्वाखाली पॅनल दिला होता. या निवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे काका अरुण तनपुरे यांच्या पॅनलने विजय मिळवला. या विजयानंतर अरुण तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित शेतकरी मेळावा घेतला.

Eknath Shinde Shiv Sena
Yogesh Kadam : कोकणात भाजप-शिवसेना वॉर सुरूच, ' ते मंत्री झाले तरीही...', माजी आमदाराचा कदमांवर प्रहार

विशेष म्हणजे, राजू शेटे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने प्रचारात महायुतीच्या तिन्ही प्रमुखांचे छायाचित्र कारखान्याच्या निवडणुकीत वापरली होती. या निवडणुकीतील पराभवाचाच वचपा घेण्यासाठीच, शिवसेनेने राहुरीतील नगरपरिषदेच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्याचे बोलले जात आहे.

राहुरी नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे. राहुरी शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल. राहुरी नगरपालिका निवडणुकीची जबाबदारी शिवसेनेचे स्थानिक नेते राजूभाऊ शेटे आणि तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे यांच्यावर असेल, असे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com