Ekath Shinde Nashik : मुख्यमंत्री शिंदेंनी उडवली विरोधकांची खिल्ली; मोदींवरोधात एकत्र येण्यापूर्वीच तुमची बोटच फुटली

Nashik Shasan Aplya Dari : "उद्धव ठाकरे कद्रू तर फडणवीस निष्कलंक"
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde On Opposition : विरोधकांची वज्रमूठ आता खोटी ठरली आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एकत्र येणाऱ्या मंडळीत मेळ राहिला नाही, अशी विरोधकांवर टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी काळात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील असा दावा केला आहे. (Latest Political News)

नाशिक येथे शनिवारी (ता. १५) शासन आपल्या दारी उपक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. कलंक शब्दवारून शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, "फडणवीसांवर कलंक लावण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस आजच्या राजकारणातील, युतीतील कलंक नाही तर निष्कलंक माणूस आहे. पण हे समजून घेण्यासाठी मनाचा तेवढा मोठेपणा असावा लागतो. कोतीवृत्ती, कद्रूपणा असलेल्या माणसांकडून ते शक्य नाही."

Eknath Shinde
Devendra Fadnavis News : 'पोटात दुखलं तर औषधासाठी डॉ. एकनाथ शिंदे, पचनी पडलं नाही तर अजितदादा..' ; फडणवीसांची मिश्किली!

यावेळी शिंदे यांनी राज्यातील विरोधकांचाही समाचार घेतला. शिंदे म्हणाले, "अजित पवार आल्याने काही जणांना वाटते तीन जण एकत्र आलेत आहेत. आता सरकारचे कसे होणार? पण त्यांना सांगतो की आम्ही समजूतदार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात मी होतो. आता मी मुख्यमंत्री तर ते उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात. यातच अजित पवारही आमच्यासोबत आले आहेत. आता हे सरकार अधिक जोमाने काम करेन."

Eknath Shinde
Eknath Shinde Nashik : नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचे धुव्वाधार भाषण; ठाकरेंना टोले, फडणीसांचं कौतुक

मी सर्वांना सोबत घेऊन जाणारा माणूस आहे. मुख्यमंत्री म्हणून सर्वांना विश्वासात घेत आहे. आपल्या युतीत सोबत असलेले २०० हून अधिक आमदार व खासदारांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देताना शिंदे यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "विरोधीपक्ष मोठी वज्रमूठ करत होती. त्यांची वज्रझूठ ठरली. त्याचबरोबर या देशाची मोट बांधायला निघालेल्यांची स्वतःची बोटच फुटली. त्याच्यात काहीच राहिले नाही. त्यामुळे सगळे मोदींवरोधात एकत्र आले तरी त्यांचा नेता ठरू शकत नाही. यातून मोदींजींचा विजय निश्चित झालेला आहे. यापूर्वीही २०१४, २०१९ मध्ये खूप आरोप झाले. आरोप झाले तेवढे त्यांचे खासदार कमी झाले. २०१९ मध्ये तर विरोधी पक्षाला आवश्यक तेवढीही त्यांची संख्या राहिली नव्हती."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com