'बंडखोरांना धनुष्यबाण चिन्ह मिळणार नसल्याने निवडणुका पुढे ढकलल्या'

Anil Patil|Elaction Commission|NCP : बंडखोराच्या कार्यकर्त्यांना कधी ना कधी 'राम' द्यावाच लागेल...
MLA Anil Patil Latest News
MLA Anil Patil Latest News Sarkarnama
Published on
Updated on

जळगाव : शिवसेनेसोबत बंडखोरी केलेल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांंना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीला उभे राहिल्यास चिन्हाचा प्रश्‍न निर्माण झाला असता, परिणामी त्यांना अपक्ष म्हणून निवडणुक लढवावी लागली असती. हे टाळण्यासाठी राज्यातील सत्ताधाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) माध्यमातून राज्यातील निवडणूका पुढे ढकलण्याचे षडयंत्र रचले आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रसचे (NCP) विधीमंडळातील प्रतोद आमदार अनिल पाटील (Anil Patil) यांनी केला आहे. ते जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीसाठी आज (ता.15 जुलै) उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (MLA Anil Patil Latest Marathi News)

MLA Anil Patil Latest News
आमच्यात मतभेद व्हावे म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवलेत..पण आमच्याकडे कलाकार..

अनिल पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कधी अर्ज भरायचा, कधी माघार घ्यायची, मतदान झाल्यावर मतमोजणी कधी करायची, असा सर्व निवडणुक कार्यक्रम आयोगाने जाहीर केला. मात्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आयोगाने सर्व कार्यक्रम रद्द केला आहे. माझ्या माहितीप्रमाणे इतिहासात फार कमी अशा घटना घडल्या आहेत. त्या पैकी ही एक आहे, असे म्हणत त्यांना अश्चर्य व्यक्त केले.

राज्यात पाऊस कधी पडतो, अतिवृष्टी कधी असते याबाबतची माहिती प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला दिलेली असते त्यामुळे आताही राज्याची माहिती निवडणूक आयोगाकडे संकलीत असेल. त्यानुसारच निवडणूक आयोगाने कार्यक्रम लावला होता. मात्र, हा कार्यक्रम रद्द का रद्द करण्यात आला यावर पाटलांना शंका उपस्थित केली.

MLA Anil Patil Latest News
नागपुरात पवार म्हणाले, आमची भविष्यातील दिशा उद्या दिल्लीत ठरेल...

पाटील म्हणाले, ओबीसी निकालाची माहिती आयोगास होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर १९ जुलैला सुनावणी होणार हे देखील निवडणूक आयोगाला माहिती होते. मग तरी देखील निवडणुक कार्यक्रम का जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा तो रद्द केला गेला. याचे प्रमुख कारण मला असे वाटते की, शिवसेनेसोबत ज्या बंडखोर आमदारांसोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली त्यांना आता या निवडणूकीला सामोरे जावे लागणार होते. त्यामुळे त्यांना २२ जुलैपासूनच या निवडणूकीत कुठले चिन्ह मिळेल याची चिंता होती. त्यांना शिवसेनेचे अधिकृत असेलेले धनुष्यबाण चिन्ह मिळणार नव्हते याची कल्पना आली होती. त्यामुळे त्यांना अपक्ष निवडणुक लढवावी लागली असती. म्हणून हा निवडणूकीचा कार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्यात आला असावा,अशी जनतेत चर्चा असून हे एक षडयंत्र असल्याचे पाटील म्हणाले. मात्र बंडखोराच्या कार्यकर्त्यांना कधी ना कधी 'राम' द्यावाच लागेल, अशा शब्दात त्यांनी बंडखोर आमदारांनी डिवचलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com