Ahilyanagar BJP MLA : भाजप आमदाराला झेडपी शाळेत आढळली कालबाह्य खाद्यमसाले; पाचपुते म्हणाले, 'निव्वळ बिले काढण्याचा प्रकार'

Expired Spices Found in Midday Meal at Shrigonda ZP School BJP MLA Vikram Pachpute Surprise Inspection : भाजप आमदार विक्रम पाचपुते यांना जिल्हा परिषदेतील शाळेतील पोषण आहाराची तपासणी केली.
Ahilyanagar BJP MLA
Ahilyanagar BJP MLASarkarnama
Published on
Updated on

Zilla Parishad school food safety : राज्यातील शाळा सुरू झाल्या असून, विद्यार्थ्यांनी शाळा परिसर भरून गेला आहे. विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने विविध योजना सुरू केल्यात. यातील मध्यान्ह भोजन योजना देखील आहे. शाळा सुरू होणार म्हणून राज्यातील झेडपी शाळांना पोषण आहारासाठी लागणारे खाद्यमसाले देण्यात आली आहेत.

पण ही खाद्यमसाले कालबाह्य झाल्याचं आढळून आलं आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी केलेल्या तपासणी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. आमदार पाचपुते यांनी यावर केवळ बिले काढण्यासाठीच खाद्यमसाले यांचे वाटप झाल्याचे की काय, याची आपण चौकशी करणार आहोत, असे म्हटले आहे.

जिल्हा परिषदेच्या श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव इथला शाळेत भाजप (BJP) आमदार विक्रम पाचपुते यांना पाहणी दौऱ्यातच पोषण आहारातील खाद्यमसाले कालबाह्य असल्याचे आढळून आले. पोषण आहार पुरवठ्याच्या पध्दतीत काही त्रुटी असल्याबाबत आवाज उठवणार असल्याचे आमदार पाचपुते यांनी सांगितले.

शालेय वर्ष सुरू झाल्याने आमदार विक्रम पाचपुते यांनी प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीगोंदा तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांना भेट दिली. या भेटी दरम्यान आमदार पाचपुते यांनी जिल्हा परिषदेच्या हिरडगाव इथल्या शाळेला (School) भेट दिली. विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Ahilyanagar BJP MLA
Teacher Health Issues : तब्बल 43 हजार 566 शिक्षक ‘दिव्यांग’ अन् ‘आजारी’; काय आहे भानगड? राज्यातील शाळांचे 'आरोग्य' चर्चेत

याचवेळी आमदार पाचपुते यांनी विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनातील आहाराची तपासणी केली. मध्यान्ह भोजनाची देखील वेळ झाल्याने आमदार पाचपुते यांनी शाळेतील पोषण आहार आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची पाहणी केली.

Ahilyanagar BJP MLA
Imtiaz Jaleel clash : भांडवलदारांच्या कर्जावर प्रश्न विचारला, निर्मला सीतारमण चिडल्या; इम्तियाज जलीलांची सांगितला किस्सा...

या पाहणीत त्यांना पोषण आहारासाठी वापरण्यात येणारे काही खाद्यमसाले कालबाह्य आढळले. याबाबत त्यांनी शिक्षकांना विचारणा केल्यावर खाद्यमसाले शाळेला मिळाले त्यावेळी उन्हाळ्याच्या सुटी होत्या. यात ते वापरता आले नाही. त्यामुळे ते कालबाह्य झाले. पण ते पोषण आहारात न वापरात बाजूला काढून ठेवल्याचे शिक्षकांनी स्पष्ट केले.

कालबाह्य मसाल्यांचा वापर

हिरडगाव इथल्या शिक्षकांनी तत्परता दाखविल्याने हे कालबाह्य मसाले बाजूला काढण्यात आले. मात्र, काही ठिकाणी ते मसाले विद्यार्थ्यांच्या आहारात गेले असू शकतात. ही बाब अत्यंत गंभीर असून याबाबत माहिती संकलित करून पोषण आहार पुरवठ्याच्या पध्दतीत काही त्रुटीवर आवाज उठवणार असल्याचा इशारा आमदार पाचपुते यांनी दिला.

माल पुरवठ्याची पद्धत संशयास्पद

आमदार पाचपुते म्हणाले, "शाळांना सुटी कालावधीत पोषण आहारासाठी लागणारा कच्चा मालाचा पुरवठा मार्च महिन्यात करण्यात आला. जवळपास तीन महिन्यांचा पोषण आहार पाठविण्यात आला. ही पध्दती संशयास्पद आहे. निव्वळ बिले काढण्यासाठीच कच्चा मालाचा पुरवठा अगोदर करण्यात आल्याचा आरोप करत, याच्या खोलात आपण जाणार आहोत".

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com