आदिवासींवर खोटे गुन्हे दाखल करून नक्षली ठरविणे चुकीचे

सोनोशी (ता. इगतपुरी) येथे रविवारी आदिवासी क्रांतिकारकांच्या संयुक्त जयंतीनिमित्त स्मारकाच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते.
Sahard Pawar
Sahard PawarSarkarnama
Published on
Updated on

घोटी : सामाजिक न्याय व परिवर्तनासाठी संघर्ष केला पाहिजे. मात्र, ज्यांनी नक्षली विचार हातात घेतला, त्यांनी आदिवासींवरही अत्याचार केले. खरा आदिवासी हा सर्वांच्या हिताचा विचार करतो. तो कोणावरही अन्याय करत नाही. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना नक्षली ठरवणे चुकीचे आहे. आदिवासी कधीही नक्षली असू शकत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी येथे केले.

Sahard Pawar
शरद पवार म्हणाले, `मी सर्व मदत करतो, आधी तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे रहा`

सोनोशी (ता. इगतपुरी) येथे रविवारी आदिवासी क्रांतिकारकांच्या संयुक्त जयंतीनिमित्त स्मारकाच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते. विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, राहीबाई पोपेरे, पालकमंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार देवीदास पिंगळे, आमदार माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर, किरण लहामटे, नितीन पवार, सुनील भुसारा, दौलत दरोडा, अशोक भांगरे, माजी आमदार शिवराम झोले, निर्मला गावित यावेळी प्रमुख पाहुणे होते.

Sahard Pawar
अलिकडचं पद्मश्री वाटप, त्यातून निघणारी मुक्ताफळं यावर काय बोलावे?

श्री. पवार म्हणाले, की स्वतः नक्षली भागाचा दौरा करून त्यांच्या अडीअडचणी, दुःख समजून घेणार आहे. राज्य सरकारच्या वतीने आवश्यक त्या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहे. या देशाचा मूळ मालक असलेल्या आदिवासींची अवस्था आज बिकट आहे. त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांचा इतिहास, त्यांची आठवण म्हणून या ठिकाणी भव्यदिव्य असे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे करायचे आहे.

ते पुढे म्हणाले, ज्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी बलिदान दिले, त्यांचे स्मरण करण्यासाठी बाडगीच्या माचीचा व राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांच्या क्रांतीचा सन्मान होत असल्याने मला आनंद होत आहे, अशा गौरवशाली परंपरेचा आपण सन्मान करणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे.

यावेळी शिवेसना उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी, कार्याध्यक्ष कोंडाजी आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, तहसीलदार परमेश्‍वर कासुळे आदी उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com