धुळे : येथील (Dhule Corporation) महापालिका हद्दवाढीतील ११ गावांमधील मूलभूत समस्या सोडवाव्यात आणि लादलेली वाढीव मालमत्ता करवाढ (Tax) स्थगित करण्यात यावी, रहिवाशांना जागेचा ८ ‘अ’चा उतारा व बखळ जागेचा उतारा देण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसच्या (Congress) शिष्टमंडळाने मनपा आयुक्त देवीदास टेकाळे (Devidas Tekale) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. (Congress opposed property tax hike in Dhule Municiple corporation)
धुळे महापालिकेने हद्दवाढीची घोषणा केली आहे. त्यामुळे हद्दवाढीने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या नागरिकांना मालमत्ता करात वाढ झाल्याची झळ बसली आहे. त्याविरोधात आता नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात आणि काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल भामरे यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने आयुक्तांशी चर्चाही केली. हद्दवाढीत अंशतः नगावसह वलवाडी, महिंदळे, भोकर, मोराणे प्र.ल., चितोड, अवधान, पिंपरी, बाळापूर, नकाणे, वरखेडीचा समावेश आहे. महापालिकेत समावेशानंतर या गावांत महत्त्वाची विकासकामे झालेली नाहीत. मूलभूत सुविधांची वानवा आहे. विकासाबाबत या गावांवर अन्याय होत आहे.
असे असताना मनपाने हद्दवाढीतील रहिवाशांना दुप्पट-तिपटीने वाढीव मालमत्ता कर आकारला आहे. याविरोधात रहिवाशांनी घेतलेल्या हरकती प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावल्या. त्यामुळे रहिवाशांमध्ये असंतोष असून, वाढीव मालमत्ता करास स्थगितीची मागणी झाली आहे. तसेच महापालिकेमार्फत विविध कागदपत्रांसह प्रशासकीय सेवाही दिल्या जात नाहीत. घर, बखळ जागेचा उतारा मिळत नाही.
त्यामुळे प्लॅन मंजुरी मिळत नाही. ती देण्यात यावी. मालमत्तेची रजिस्टर खरेदीही सुरू करण्यात यावी, अशी मागणी डॉ. भामरे, प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ, ज्येष्ठ रमेश श्रीखंडे, छोटूभाऊ चौधरी, दीपक गवळे, बापू खैरनार, ऋषी ठाकरे, महिला जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, पप्पू सहानी, हरिभाऊ चौधरी, रजिया सुलताना सय्यद आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.