Farmers News : ‘तुम्ही गोळ्या घातल्या तरी जमीन देणार नाही’

Farmers got angry in front of Minister, we would not give the land even if you shoot us-सुरत-चेन्नई महामार्गाच्या मूल्यांकनातील गंभीर त्रुटींचा केंद्रीय मंत्र्यांनीच केला पंचनामा
Angree Farmers with Dr. Bharati Pawar
Angree Farmers with Dr. Bharati Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Dr. Bharati Pawar News : सुरत चेन्नई महामार्गाच्या भूसंपादनाबाबत आज केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. अतिशय वादळी झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांनी कठोर शब्दांत भावना व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला. योग्य मोबदला नसेल, तर बंदुका चालवा की, गोळ्या घाला, आम्ही कुटुंबासह जीव देऊ; पण जमीन देणार नाही, असा इशारा देण्यात आला. (Chennai highway affected farmers meeting in Collector Office)

सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादनाबाबत आज केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांची (Farmers) बैठक झाली. या वेळी खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांसह आमदार दिलीप बनकर, सरोज आहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा उपस्थित होते.

Angree Farmers with Dr. Bharati Pawar
Nandurbar BJP NEWS : अंतर्गत सर्व्हेमुळे विजयकुमार गावित यांना भाजपने दूर केले?

बैठकीतील सूर, प्रशासनाने जमिनीच्या सर्वेक्षणात केलेल्या चुका व शेतकऱ्यांचा संताप लक्षात घेतल्यावर, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी या महामार्गासाठी किती शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार, एवढ्या साध्या प्रश्नाचे उत्तर नसेल तर मग मूल्यांकन करून दर जाहीर केलेच कसे?, असा प्रश्न केला. सदोष मूल्यांकनामुळे शेतकरी आक्रमक झाले, याला प्रशासकीय यंत्रणाच जबाबदार आहे. या सदोष पंचनाम्यांचे ऑडिट होईल, असा कडक इशारा प्रशासनाला दिला.

राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या, भूसंपादनापूर्वी शेतकऱ्यांची बैठक घेतली नाही. त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. समस्यांचे निराकरण न करताच मूल्यांकन जाहीर केले. मूल्यांकनात मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. त्या दूर करायची वेळ आली तर तशी तरदूत नसल्याचे कसे काय सांगता?. कायदा लोकांसाठी नाही का, हे सगळे हवेतले बाण आहेत. प्रशासनाच्या या गंभीर चुका असहनीय आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या तक्रारींविषयी बोलताना भूसंपादन आधिकाऱ्यांनी एकदा अॅवार्ड झाल्यानंतर त्यात बदल करता येत नसल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी शर्मा यांनीही तसा बदल करता येत नसल्याचे सांगितले. त्यानंतर उपस्थित शेतकरी, लोकप्रतिनिधींचा पारा चांगलाच चढला होता. भूसंपादन करण्याआधी बैठक घेण्याची वारंवार विनंती करूनही बैठका घेतल्या नाहीत. मग अॅवार्ड जाहीर करण्याची घाई कशी केली, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली.

Angree Farmers with Dr. Bharati Pawar
Shocking News : केंद्रीय मंत्री भारती पवार म्हणतात, ‘मी महामार्गाने प्रवास बंद केला’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com