Girish Mahajan: कार्यकर्त्यांवरील धार्मिक गुन्हे मागे घेणार

पालकमंत्री गिरीश महाजन यांचे गणेश विसर्जन पूजनप्रसंगी संकेत
Minister Girish Mahajan
Minister Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) काळात कार्यकर्त्यांवर गुन्हे (FIR) दाखल झाले होते, हे गुन्हे (Crimes) तातडीने मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता नव्याने गुन्हे दाखल होणार नाहीत, (There will not be file any FIR) याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले. (FIR regarding religious activity will be write off)

Minister Girish Mahajan
MVP News: दर तीन महिन्यांनी शरद पवारांची भेट घेऊ!

दहा दिवसांपूर्वी वाजतगाजत आगमन झालेल्या लाडक्या गणरायाला काल ढोल ताशांच्या गजरात भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. वाकडी बारव येथून निघालेल्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते नारळ वाढवून आरतीनंतर शुभारंभ करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पालकमंत्र्यांनी काहीकाळ ढोल वादनाचाही आनंद घेतला.

Minister Girish Mahajan
Jalgaon News: मिरवणूकीत महापौरांच्या घरावर हल्ला करणारे अटकेत

यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमाताई हिरे, ॲड. राहुल ढिकले, बाळासाहेब सानप, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, गजानन शेलार, विनायक पांडे, रामसिंग बावरी, गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, जगदीश पाटील, सतीश शुक्ल, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, महापालिका आयुक्त आदींसह विविध मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी पावणेबाराच्या सुमारास मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

सुरवातीला महापालिकेसह भद्रकाली येथी साक्षी गणेश, चांदीचा गणपती, दंडे हनुमान मित्र मंडळ, विनायक पांडे यांचा शिवसेवा मित्र मंडळ, वसंत गिते यांचे मुंबई नाका मित्र मंडळ, नवप्रकाश सूर्यप्रकाश मित्र मंडळ, रोकडोबा मित्र मंडळ, गुलालवाडी व्यायामशाळा, नाशिकचा राजा आदींसह २० मंडळे सहभागी झाली होती. पावसाच्या शक्यतेने मिरवणुकांना सकाळी लवकर सुरवात झालीतरी दोन मंडळांत मोठे अंतर पडल्याने या मिरवणुका मध्यरात्री रस्त्यावरच होत्या.

ढोलवादनाने वाढवली रंगत

पोलिसांनी डिजेसारख्या वाद्यांना परवानगी नाकारल्याने पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका निघाल्या. रविवार कारंजावरील चांदीच्या गणपती मंडळाच्या सहस्रनाम ढोल पथकात तब्बल साडेतीनशे वादक उपस्थित होते, यात ९० ढोल व २१ ताशांसह १२ ध्वजधारक सहभागी झाले होते. मानाच्या महापालिकेच्या गणपती मिरवणुकीत गरीबरथ ढोल पथकाचे १२० वादक ६० ढोल व १८ ताशांसह सहभागी झाले होते, तर भद्रकाली येथील साक्षी गणेश मंडळाच्या मिरवणुकीत मार्तंडभैरव ढोल पथकाने रंगत वाढविली.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com