जळगावला खासदार, आमदारांसह हजारोंच्या विरोधात गुन्हा!

जिल्हयातील चाळीसगाव शहरात रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्वागतानिमित्त मिरवणूक काढण्यात आली.
Chalisgaon Procession
Chalisgaon ProcessionSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : जिल्हयातील चाळीसगाव (Chalisgaon) शहरात रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj Statue)अश्वारूढ पुतळ्याच्या स्वागतानिमित्त मिरवणूक (Procession) काढण्यात आली. त्यात परवानगीच्या अटींचा भंग (Breach of terms) झाला. त्यामुळे पोलीस (Police) ठाण्यात खासदार उन्मेष पाटील, (Unmesh Patil) आमदार मंगेश चव्हाण, (Mangesh Chavan) माजी आमदार राजीव देशमुख, (Rajiv Deshmukh) नगराध्यक्षा आशालता चव्हाण (Ashalata Chavan) यांसह चार ते पाच हजार लोकांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल झाला आहे.

Chalisgaon Procession
आदिवासींना घरे नकोत का?. त्यामुळे यापुढे पाडा तिथे ‘म्हाडा’

गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारुढ पुतळा शहरातील सिग्नल चौकात चबुतर्यावर बसवण्यात आला. आपल्या राजाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. पुतळ्याच्या आगमन व स्वागता निमित्ताने परवानगी मिळण्यासाठी शहर पोलीसात अर्ज करण्यात आला होता. मात्र, कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून गर्दी टाळण्यासाठी राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, रॅली, मिरवणूक आदींवर शासनाने बंदी घातली आहे. याशिवाय जिल्हाधिकार्यांनी २४ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरपर्यंत जळगाव जिल्ह्यात पाच किंवा पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मज्जाव केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्वागत मिरवणुकीची परवानगी देताना दोनशेपेक्षा जास्त लोक एकत्र येणार नाही, या अटीवर परवानगी देण्यात आली होती. शिवाय नियमांविरूद्ध कोणतेही कृत्य करू नये अशी सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीसही पोलीसांनी बजावली होती.

Chalisgaon Procession
जळगाव जिल्हा बँकेत राजकीय वैर विसरून खडसे, महाजन एकत्र!

रविवारी दुपारी ३ ते रात्री साडेआठच्या दरम्यान बिलाखेड ते शहरातील सिग्नल चौकादरम्यान ४ ते ५ हजार अनोळखी जनसमुदायाच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सोशल डिस्टेन्सिंगचे पालन न करता चेहऱ्यावर मास्क न लावता गर्दी जमवली गेली. ज्यामुळे जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी निगर्मित केलेल्या आदेशाचे उल्लंघन झाले.

पोलीस नाईक भटू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आगमन समितीचे सदस्य घृष्णेश्वर पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, नगरसेवक राजेंद्र चौधरी, संजय रतनसिंग पाटील, शाम देशमुख, भगवान पाटील, रामचंद्र जाधव, शेखर देशमुख, जगदीश चौधरी, पंचायत समितीचे सदस्य संजय पाटील, रमेश चव्हाण, सूर्यकांत ठाकूर, नितीन पाटील, सदानंद चौधरी यांच्यासह इतर अनोळखी ४ ते ५ हजार जणांच्या विरोधात भादंवि कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१बी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे ३७ (३) (१) व १३५ प्रमाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...

नेमका कोणत्या कारणामुळे गुन्हा दाखल झाला हे माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे गुन्हा दाखल झाला असेल तर तो हजारदा आपल्याला मान्य आहे.

- राजीव देशमुख, माजी आमदार , चाळीसगाव

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com