Eknath Khadse News: भुसावळमध्ये एकनाथ खडसेंना धक्का; राष्ट्रवादीच्या पाच माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

NCP-BJP News : ऐन निवडणुकीच्या तोंडावर खडसेंना गृहजिल्ह्यातच मोठा धक्का बसला आहे.
NCP Five former corporators join BJP
NCP Five former corporators join BJPSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Political News: भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या पाच माजी नगरसेवकांनी आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पुन्हा कमळ हाती घेतले आहे. माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला हा हादरा समजला जात आहे. (Five former corporators of NCP join BJP)

प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, माजी नगरसेवक बोधराज चौधरी, माजी नगरसेविका शोभा नेमाडे यांचे पुत्र दिनेश नेमाडे, माजी नगरसेविका शैलजा नारखेडे यांचे पती पुरुषोत्तम नारखेडे, तसेच अनिकेत पाटील यांनी आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. याशिवाय काही पक्ष पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

NCP Five former corporators join BJP
Maharashtra Politics : राष्ट्रवादीचं हातचं राखून वागणं; भाजप-शिंदे गटाचं टेन्शन वाढविणारं...

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या काळात ९ माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यातील दोन माजी नगरसेवकांनी याआधीच भाजपत प्रवेश केलेला आहे. उरलेले दोन माजी नगरसेवकही भाजपच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भुसावळमध्ये खडसेंना पर्यायाने राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे.

NCP Five former corporators join BJP
Nashik Guardian Minister : पालकमंत्री बदलाचा भुसेंनी घेतला धसका; महाजनांनंतर पुन्हा घेतली आढावा बैठक, उद्‌घाटनही उरकले...

हे पाचही माजी नगरसेवक हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र, त्यांनीच साथ सोडल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर खडसेंना गृहजिल्ह्यातच मोठा धक्का बसला आहे. आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com