Gauri Mahadik; वीरपत्नी कॅप्टन गौरी महाडिकांना ‘कॅट’चे विंग प्रदान

‘कॅट’च्या तुकडीतील चार महिलांसह नायजेरियन अधिकाऱ्यांना विंग प्रदान.
CAT Wing presentation ceremony
CAT Wing presentation ceremonySarkarnama

नाशिक : कॉम्बॅट आर्मी (CAT) एव्हिएशनच्या गांधीनगर (Nashik) येथील तळावर आज एव्हिएटर्स कोर्स, (AviationTraining) एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स आणि बेसिक रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टिम कोर्सच्या अशा विविध पाठ्यक्रमात नैपुण्य मिळविणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांना विंग प्रदान करण्यात आले. यामध्ये शहीद कर्नल महाडीक (Col. Mahadik) यांच्या वीरपत्नी कॅप्टन गौरी महाडिक (Gauri Mahadik) यांचा समावेष आहे. (CAT training school wing ceremony in Nashik )

CAT Wing presentation ceremony
Arvind Sawant : आजारपणावर केलेली टीका न शोभणारी; अरविंद सांवतांनी राज ठाकरेंना सुनावले

कॅप्टन गौरी महाडिक वीरपत्नी आहेत. त्यांचे पती २०१७ मध्ये अरुणाचल प्रदेशात सीमेवर सुरक्षेदरम्यान शहीद झाले होते. २०१५ मध्ये विवाहानंतर दोन वर्षांत आलेल्या परिस्थितीला तोंड देताना कॅप्टन गौरी महाडिक यांनी लष्करातील वीरपत्नीसाठीचे ४९ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण करीत, स्वतःही देशसेवेसाठी योगदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुरुवारी त्यांनी आर्मी एव्हिएशनचे एव्हिएटर्स म्हणून पदक मिळविले. नायजेरियन अधिकारी मेजर ऑफोडिल हेही पास झाले.

CAT Wing presentation ceremony
Eknath Shinde : मोदींच्या 'या' निर्णयामुळे शिंदे सरकारच्या अडचणी वाढणार ; हिवाळी अधिवेशनात गदारोळ ?

‘कॅट’च्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात विंग मिळविणाऱ्यांत चार महिला अधिकारी आहेत. एकाचवेळी चार महिला अधिकाऱ्यांचा प्रवेश हेही या तुकडीचे वैशिष्ट्य राहिले. अनुमेघा त्यागी, ओजस अग्रवाल, गौरी महाडिक, कॅप्टन सुजाता अशा चार महिलांनी हा सन्मान मिळविला. त्यात, कॅप्टन सुजाता यांचे पती विवेक लष्करात अधिकारी आहे.

‘कॅट’चे महासंचालक आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचे कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल अजयकुमार सुरी यांच्या उपस्थितीत झालेल्या विंग प्रदान कार्यक्रमाला सहसंचालक कमांडिग ऑफिसर ब्रिगेडियर संजय बाढेरा, ‘कॅट’चे सह संचालक कर्नल डी. के. चौधरी आदींच्या उपस्थितीत विंग प्रदान करण्यात आले.

५८ एव्हिएटर्सचा गौरव

प्रशिक्षणादरम्यान ५७ अधिकाऱ्यांना कॉम्बॅट एव्हिएटर्स/आरपीएएस क्रू म्हणून विमान उड्डाणाचे कठोर प्रशिक्षण देण्यात आले. यात नायजेरियन अधिकाऱ्यासह ३२ अधिकाऱ्यांना (कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्स) यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर कॉम्बॅट हेलिकॉप्टर पायलट बनण्यासाठी प्रतिष्ठित एव्हिएशन विंग्सने सन्मानित करण्यात आले. याशिवाय एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स (एएचआयसी) सात अधिकाऱ्यांना एव्हिएशन हेलिकॉप्टर प्रशिक्षक म्हणून, तर क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर (क्यूएफआय) बॅच देण्यात आले. बेसिक रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टिम प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल १८ अधिकाऱ्यांना (आरपीएएस पायलट) म्हणून गौरविण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com