Arvind Sawant
Arvind SawantSarkarnama

Arvind Sawant : आजारपणावर केलेली टीका न शोभणारी; अरविंद सांवतांनी राज ठाकरेंना सुनावले

'आजारावर मात करून बाहेर आले याचे दु:ख तर नाही ना?'
Published on

Arvind Sawant News :''मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरे तब्येतीचं कारण सांगून बाहेर पडत नव्हते. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि आता ते सगळीकडे फिरत आहेत'', अशी टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. आता या टिकेला ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलंय.

सावंत म्हणाले, ''उद्धव ठाकरेच्या तब्बेतीवरून राज ठाकरेंनी केलेली टीका ही न शोभणारी आहे. उद्धव ठाकरे मुख्ममंत्री होते त्यावेळी कोरोना (Corona) होता हे सर्वां माहिती आहे. तेव्हा कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री काय पंतप्रधानही बाहेर फिरत नव्हते. महत्त्वाचं म्हणजे तेव्हा अनेक सर्वेक्षणं करण्यात आली. त्या सर्वेक्षणांमध्ये देशात उत्तम मुख्यमंत्री कोण होतं? तर सातत्याने उद्धव ठाकरे यांच नाव समोर येत होतं, असं ते म्हणाले.

Arvind Sawant
पालकमंत्री चंद्रकांतदादांसमोरच भाजपच्या दोन आमदारांमध्ये जुंपली...

''ज्या डॉक्टरांनी उद्धव ठाकरे यांच्यावर उपचार केले. त्यांची कधी मुलाखत घेऊन बघा. तेव्हा तुम्हाला कळेल की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किती मोठ्या आजारातून बाहेर आलेत. पण ते एका मोठ्या आजारावर मात करून बाहेर आले याचे दु:ख तर नाही ना? पण राज ठाकरेंनी ज्याप्रकारे टीका केली ती त्यांना न शोभणारी आहे'', असे खोचक टीका सावंत यांनी राज ठाकरेंवर (Raj Thackeray) केली.

Arvind Sawant
Jalgaon Municipal Corporation : जळगाव महापालिका आयुक्त बदलीची पडद्यामागची राजकीय खेळी?

दरम्यान, ''कोरोनाच्या (Corona) काळात आपल्या राज्यात कमी वेळेत टास्क फोर्स, रुग्णालये स्थापन करण्यात आली. त्याचं कौतुक सर्वोच्च न्यायालयासह जागतिक आरोप संघटनेने देखील केले होते. या गोष्टींचा तुम्हाला अभिमान वाटायला हवा, पण तुम्ही आजारपणावर प्रश्न उपस्थित करता हे किती योग्य?'' असं सावंत (Arvind Sawant) म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com