Assembly election 2023 : नरेंद्र मोदींची लाट घटली नव्हे तर वाढली!

Four states assembly election results shows Modi Wave is Conitnue-छगन भुजबळ यांचा दावा, आगामी लोकसभा निवडणुकीतदेखील भाजपचेच सरकार येईल हे सांगणारा निकाल.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal On Assembly Result : विधानसभा निवडणुकीत गेल्यावेळी कमावलेली राज्येदेखील काँग्रेसकडून भाजपने हिसकावून घेतली आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट कमी झालेली नसून आणखी वाढलीआहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. (Congress lost two major state, It is setback for Upcoming elections)

देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. त्यात तीन राज्यांत भाजपने (BJP) बाजी मारली. काँग्रेसची (Congress) पिछेहाट झाली. त्याबाबत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची लाट वाढली आहे, असे म्हटले आहे.

Chhagan Bhujbal
Assembly Election Result 2023 : कौल ४ राज्यांचा, चाहूल लोकसभेची

भुजबळ म्हणाले, छत्तीसगड राज्यात भाजपची सत्ता होती, तेथे भाजपने सत्ता संपादन केली आहे. राजस्थान काँग्रेसकडे होते, तेथेही भाजपची सत्ता आली आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला सत्ता मिळेल, असा काही लोकांचा होरा होता, मात्र तेथे देखील भाजपने आपली सत्ता राखली आहे. येथे मोठे अंतर आहेत. दोन राज्ये काँग्रेसच्या हातून गेली आहेत. तेलंगना या एकमेव राज्यात काँग्रेसची सत्ता आली आहे. एकूण लोकसंख्या व मोठी राज्ये असल्याने व चारपैकीतीन राज्यांत भाजपची सत्ता आली आहे. काँग्रेसची दोन राज्ये ओढून घेतली आहे.

ते म्हणाले, या सर्व निकालाचा अर्थ पाहिला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा कमी झाला आहे, असे कुठेही दिसत नाही. किंबहुना तो वाढला आहे. गेल्या वेळेला तरी मध्य प्रदेशात कमी जागा होत्या, त्यात आता वाढ झाली आहे. मागच्या निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तिन्ही राज्यांत काँग्रेसची सत्ता आली होती. परंतु आता हे तिन्ही राज्ये भाजपकडे गेली आहेत. त्यामुळे साहजिकच भाजप व पंतप्रधान मोदी यांचा हा विजय आहे.

पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता कमी झालेली नाही, असे एकंदर चित्र दिसते आहे. देशात आंदोलने खूप झाली. काँग्रेसची यात्रा निघाली. अनेक लोक विरोधात बोलत होते. त्यामुळे त्याचा परिणाम होईल, असे बोलले जात होते. मात्र, तसे काहीही झालेले नाही. ही मोठी राज्ये असल्याने येत्या चार, पाच महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतदेखील भाजपचेच सरकार येईल, असे चित्र आहे, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.

इंडिया आघाडीचा प्रभाव नाही

इंडिया आघाडीत काही मतभेद असले तरीही, ही आघाडी उभी राहिली होती. त्यातून काही तरी राजकीय परिणाम होईल, असे दिसत नाही. त्यामुळे आगामी काळात या आघाडीचे काय होईल, हे सागंता येत नाही. एकूणच हा निकाल खूप काही सांगणारा आहे. यात काँग्रेसचे नुकसान झालेले आहे.

Chhagan Bhujbal
Arvind Kejriwal : केजरीवाल यांना सर्वाधिक आशा होती, त्यांचेच डिपॉझिट जप्त ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com