महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजमध्ये गटबाजी जोरात!

भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी नगरसेवक विशाल संगमनेरे यांना गद्दार संबोधले!
Girish Palve & Vishal Sangamnere
Girish Palve & Vishal SangamnereSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : भाजप नगरसेवक विशाल संगमनेरे (Vishal Sangamnere) यांनी शिवसेना नेत्यांची भेट घेतल्यानंतर शहराध्यक्ष गिरीश पालवे (BJP city President Girish Palve) यांनी त्यांना गद्दार संबोधल्यानंतर पालवे यांच्या वक्तव्याचा आधार घेत वरिष्ठ पातळीवर त्यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठी गटबाजी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संगमनेरे गद्दार होते, तर प्रभाग समिती सभापतीच्या निवडणुकीत गैरहजर राहिल्यानंतर त्यांच्यावर पालवे यांनी कारवाई का केली नाही, असा सवाल भाजपमधून उपस्थित केला जात आहे.

Girish Palve & Vishal Sangamnere
भाजपला खिंडार; ग्रामपंचायतीवर फडकला शिवसेनेचा भगवा

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथीला सुरवात झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांची नगरसेवक संगमनेरे यांनी भेट घेतल्याने राजकीय उलथापालथीचा नारळ फुटल्याचे मानले जात आहे. संगमनेरे यांच्या भेटीनंतर भाजप शहराध्यक्ष पालवे यांनी संगमनेर हे गद्दार असल्याचे वक्तव्य केले आहे. संगमनेरे यांच्या सेना नेत्यांच्या भेटीचे समर्थन भाजप नगरसेवकांनी केले नसले तरी पालवे यांच्या वक्तव्याचा आधार घेत पालवे यांच्या विरोधातच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर महापौर निवडणूक व प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या काही नगरसेवकांनी पक्षाविरोधात केलेल्या कामाचे दाखले दिले जात आहे.

Girish Palve & Vishal Sangamnere
संजय राऊत तुम्ही महाविकास आघाडीचे शिल्पकार, शिल्पाला ओरखडा जाऊ देऊ नका!

महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपचे १२ नगरसेवक शिवसेनेच्या गटात दाखल झाले होते. ऐनवेळी नगरसेवक माघारी फिरल्याने भाजपला महापालिकेत पुन्हा सत्ता स्थापन करण्यात आली. त्यावेळी जे नगरसेवक शिवसेनेकडे वळले होते. त्यांच्यावर कारवाई अपेक्षित होती, परंतु त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यानंतर एप्रिल महिन्यात पार पडलेल्या प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीत नाशिक रोड विभागात सत्तेची संधी असताना भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे व सीमा ताजणे गैरहजर राहिल्याने शिवसेनेकडे सत्ता गेली. संगमनेरे व ताजणे या दोघांवरही कारवाई होणे अपेक्षित होते, मात्र कुठलीही कारवाई पालवे यांनी केली नाही.

विभागीय आयुक्तांकडे धाव घेत दोघांवर कारवाई केली असती तर पक्षांतर बंदीचा कायदा लागू होऊन सहा वर्ष निवडणूक बंदी घालता आली असती, मात्र आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरे शिवसेना नेत्यांची भेट घेत असल्याने त्यांच्यावर पालवे यांनी टिकास्र सोडल्याने पक्षातच वाद निर्माण झाला आहे.

नगरसेवकांना घातले पाठीशी

प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीनंतर पालवे यांनी दोन्ही नगरसेवकांवर कारवाई केली नाही. उलट पालवे यांनीच दोन्ही नगरसेवकांना पाठीशी घातल्याचा आरोप होत आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप सांगतील, त्याप्रमाणे पालवे यांनी भूमिका घेतली. ज्यावेळी कारवाई करण्याची वेळ होती, त्यावेळी पालवे शांत राहिल्याने आता कुठल्या आधारे टीका करीत आहेत, असा सवाल नगरसेवकांमधून उपस्थित केला जात आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com