नवापूर : येथील पोलिस (Police) ठाण्यातील कारागृहातील (Jail) शौचालयाची खिडकी तोडून फरार झालेल्या पाचपैकी एका कैदीला सोमवारी गुजरात पोलिसांनी पकडले. उर्वरीत चारही अद्याप फरार असून नवापूर व नंदुरबार(Nandurbar) पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. (Nandurbar Police behind abscond four prisoner)
पकडलेल्या हैदर पठाणला न्यायालयाने नऊ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या घटनेला आजचा दुसरा दिवस असूनही नवापूर पोलिस ठण्यातून घटनेबाबत अधिकृत माहिती मिळत नाही. पोलिस तपास करीत आहेत एवढेच सांगितले जाते.
नवापूर पोलिस ठाण्यात ५ डिसेंबरला ही घटना घडली. ही घटना कळताच पोलिस प्रशासनाची कैद्यांना पकडण्यासाठी धावपळ सुरू झाली. पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे काल दिवसभर नवापूर परिसरात तळ ठोकून होते. घटनेबाबत गुजरात पोलिसांना कळवून कैद्यांना पकडण्यासाठी मदत घेतली आहे. पळालेले कैदी गुजरात राज्याच्या दिशेने गेले असे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले. पोलिसांसह स्थानिक नागरिकही शोध मोहिमेत सहभागी झाले होते.
गुजरात पोलिसांनी एकाला पकडले होते. प्रशासकीय बाब पूर्ण करून कैद्याला नवापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आज त्याला नवापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास नऊ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
नवापूर शहरात दरोड्याच्या हेतूने स्कॉर्पिओ वाहनात आलेल्या पाच जणांना संशयावरून रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पकडून कारागृहात ठेवले होते. कारागृहाची मागील बाजू म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पोलिस ठाणे ते बजरंग चौक, शास्त्री नगर हा चोवीस तास वर्दळीचा परीसर. या वर्दळीच्या भागातून पाच कैदी निकर बनियनवर तर काही नाईट पॅन्टवर पळून गेले. कारागृहाच्या मागील बाजूस वास्तव्यास असणाऱ्या संजय सोनवणे यांनी हवालदार निजाम पाडवी यांना भ्रमणध्वनी वरून माहिती दिली होती. त्यानंतर पोलिस प्रशासन कामाला लागले. पळून गेलेले कैदी दरोड्यातील व चंदन चोर असल्याचे सांगितले जाते.
जिल्हा पोलिस प्रशासनचे अधिकारी, नवापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक, स्वान पथकसह सर्व यंत्रणा कैद्यांना पकडण्यासाठी कामाला लागले आहेत. सोशियल मीडियावर फरार कैद्यांचे छायाचित्रे व्हायरल झाली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.