Narhari Zirwal News : अजितदादा उपमुख्यमंत्री झाले अन॒ मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत नरहरी झिरवाळांना गिफ्ट मिळाले...

नरहरी झिरवाळ हे अजित पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले जात आहे. त्या मंत्रिपदाच्या यादीत झिरवाळ यांचा नंबर होता, अशी चर्चा होती.
Ajit Pawar-Narhari Zirwal
Ajit Pawar-Narhari Zirwal Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवार यांनी शिवसेना-भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ मंत्र्यांनीही शपथ घेतली. या शपथविधीला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हेही उपस्थित होते. ते अजित पवार यांच्यासोबत असल्याचे सांगिले जाते. सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत झिरवाळ यांच्या मतदारसंघासाठी गिफ्ट मिळाले, असून ३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (Fund of 36 crore 40 lakhs approved for Dindori Constituency)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दोन जुलै रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सरचिटणीस सुनील तटकरे यांच्यासोबत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळही उपस्थित होते.

Ajit Pawar-Narhari Zirwal
Dilip Walse Patil News : वळसे पाटील पवारांची साथ सोडून अजितदादांसोबत का गेले?; निकटवर्तीय नेत्याने सांगितले हे कारण...

नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) हे अजित पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले जात आहे. त्या मंत्रिपदाच्या यादीत झिरवाळ यांचा नंबर होता, अशी चर्चा होती. मात्र, ऐनवेळी छगन भुजबळ आल्याने झिरवाळ यांची मंत्रिपदाची संधी गेल्याचेही बोलले जात आहे. शपथविधी सोहळ्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून झिरवाळ नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे त्यांची अधिकृत भूमिका अजूनही पुढे आलेली नाही. मात्र, ते अजितदादांसोबत असल्याचे सांगितले जात आहे.

Ajit Pawar-Narhari Zirwal
Ajit Pawar Group News : अजित पवारांना अर्थ, तर वळसे पाटलांना कृषी मंत्रालय?; इतर सात जणांना मिळणार ‘ही’ खाती...?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत झिरवळ यांना सरकारकडून गिफ्ट देण्यात आले आहे. त्यांच्या दिंडोरी मतदारसंघातील चिमणपाडा प्रवाही वळण योजनेसाठी सरकारने तब्बल ३६ कोटी ४० लाखांची तरतूद केली आहे. पश्चिम वाहिनी नद्यांद्वारे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. या योजनेचा १११ हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.

Ajit Pawar-Narhari Zirwal
Shinde Group Upset : आता नाराज होऊन काय फायदा? अर्धी अर्धी भाकरी खावी लागणार; अजित पवारांच्या एन्ट्रीनंतर शिंदे गटाची हतबलता

नाशिक जिल्ह्यातून छगन भुजबळ हेही या सरकारमध्ये सामील झाले आहेत, त्यांचेही हा निधी मिळविण्यासाठी मदत झाली असणार. कारण, विरोधी पक्षात असताना या प्रश्नावर भुजबळ यांनी आवाज उठवला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com